धक्कादायक! नागपुरात कोट्यवधी रुपयांचा कचरा घोटाळा उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 02:05 PM2020-06-28T14:05:37+5:302020-06-28T14:07:21+5:30

गाडीवाला आया तू कचरा निकाल हे दररोज सकाळी शहरातून फिरणाऱ्या कचरा गाडीत वाजणारे गाणे, बदलून, गाडीवाला आया तू पत्थर-मिट्टी निकाल असे करावे की काय असा प्रश्न रविवारी उघडकीस आलेल्या कचरा घोटाळ्याने निर्माण केला आहे.

Shocking! Billions of rupees worth of garbage scam exposed in Nagpur | धक्कादायक! नागपुरात कोट्यवधी रुपयांचा कचरा घोटाळा उघडकीस

धक्कादायक! नागपुरात कोट्यवधी रुपयांचा कचरा घोटाळा उघडकीस

Next
ठळक मुद्देगाडीवाला आया तू मिट्टी-पत्थर निकाल...

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: गाडीवाला आया तू कचरा निकाल हे दररोज सकाळी शहरातून फिरणाऱ्या कचरा गाडीत वाजणारे गाणे, बदलून, गाडीवाला आया तू पत्थर-मिट्टी निकाल असे करावे की काय असा प्रश्न रविवारी उघडकीस आलेल्या कचरा घोटाळ्याने निर्माण केला आहे. कचरा घोटाळ्याचे हे स्टिंग ऑपरेशन काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले.
शहरातून गोळा केलेला कचरा भांडेवाडी डंपिंग यार्डमध्ये जमा केला जातो. येथे कचऱ्याचे वजन पाहून रक्कम दिली जाते. कचऱ्याचे वजन वाढवून दाखवण्याचा गोरखधंदा केल्या कित्येक दिवसांपासून सुरू असल्याची माहिती आमदार विकास ठाकरे यांना मिळाली. कचऱ्याच्या गाडीत कचऱ्याच्या खाली मोठाले दगड व माती टाकून त्याचे वजन कचऱ्यात बेमालूमपणे मिसळून शासनाची लूट सुरू होती. ही माहिती कळताच आमदार विकास ठाकरे व काँग्रेसच्या अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भांडेवाडी डंपिंग यार्डमध्ये रविवारी सकाळी या गाड्या अडवल्या. गाडीतील कचरा रस्त्यावर ओतायला लावला आणि कचरा कमी व दगडमाती जास्त असलेला एक मोठा ढीग रस्त्यावर जमा झाला. यामुळे शहरातील कोट्यवधी रुपयांचा कचरा घोटाळा उघडकीस आला आहे.

Web Title: Shocking! Billions of rupees worth of garbage scam exposed in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.