शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नागपुरातील  ७८२ उंच इमारतीत अग्निशमन सुविधा नाहीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:15 IST

ऐकून अनेकांचा विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. नागपूर शहरातील १५ मिटरवर उंच असलेल्या १ हजार ७५९ पैकी तब्बल ७८२ इमारतींमध्ये आवश्यक अग्निशमन सुविधा नाहीत. हा कोणत्या खासगी कंपनीचा आकडा नसून महापालिकेच्या अग्निशमन विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची गंभीर दखल घेऊन यावर स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाची गंभीर दखल : स्वत: दाखल केली जनहित याचिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऐकून अनेकांचा विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. नागपूर शहरातील १५ मिटरवर उंच असलेल्या १ हजार ७५९ पैकी तब्बल ७८२ इमारतींमध्ये आवश्यक अग्निशमन सुविधा नाहीत. हा कोणत्या खासगी कंपनीचा आकडा नसून महापालिकेच्या अग्निशमन विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची गंभीर दखल घेऊन यावर स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.महापालिकेच्या अग्निशमन विभागाने ३१ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत शहरातील इमारतींचे सर्वेक्षण केले. दरम्यान, ७८२ उंच इमारतीमध्ये महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवनसंरक्षक उपाययोजना कायदा-२००६ अंतर्गत आवश्यक असलेल्या अग्निशमन सुविधा नसल्याचे आढळून आले. त्यात मॉल्स, मंगल कार्यालये इत्यादी व्यावसायिक व रहिवासी इमारतींचा समावेश आहे. या इमारतींना धोकादायक घोषित करण्यात आले आहे व सर्व इमारती तत्काळ रिकाम्या करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. तसेच, महापालिकेच्या जल पुरवठा विभागाला व ओसीडब्ल्यू कंपनीला जल पुरवठा तर, महावितरण व एसएनडीएल यांना वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाने जनहित याचिका दखल करून घेतल्यामुळे येणाऱ्या दिवसांत या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लागण्याची शक्यता आहे. याचिकेमध्ये गृह विभागाचे सचिव, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, महापालिका आयुक्त, मुख्य अग्निशमन अधिकारी, नागपूर सुधार प्रन्यास सभापती व जिल्हाधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.या सुविधांचा अभावशहरातील बहुतेक इमारती राष्ट्रीय इमारत संहितेनुसार बांधण्यात आलेल्या नाहीत. अनेक इमारतींच्या छतावर पाणी टाकी व पंप नाही. आवश्यक अग्निशमन यंत्रे नाहीत. स्प्रिंक्लर प्रणाली नाही. आपत्कालीन पायऱ्यानाहीत. नियमित पायºया वेगवान हालचाली करण्यासाठी अयोग्य आहेत. अग्निशमन विभागाने इमारत मालकांना नोटीस बजावून आवश्यक सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. परंतु, नोटीसला कुणीच जुमानले नाही. परिस्थिती जैसे थे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयfireआग