शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : नागपुरातील ४५० कर्मचाऱ्यांचे पोस्टल बॅलेट रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील निवडणूक कामासाठी तैनात असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेटसंदर्भात ...

ठळक मुद्देअनेक निवडणूक कर्मचाऱ्यांनी भरले चुकीचे अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील निवडणूक कामासाठी तैनात असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेटसंदर्भात भरलेल्या अर्जात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. चुकीचे अर्ज भरणाऱ्या ४५० कर्मचाऱ्यांचे पोस्टल बॅलेट पेपर रद्द झाले असल्याची माहिती पुढे आली आहे.निवडणूक कामासाठी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटद्वारा मतदानाचा हक्क बजावता येतो. त्यासाठी त्यांना निवडणूक कामाच्या प्रशिक्षणादरम्यान एक फॉर्म भरून द्यावा लागतो. यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यास त्याची संपूर्ण माहिती भरावी लागते. या माहितीच्या आधारावर निवडणूक विभागातील कर्मचारी त्या कर्मचाऱ्याचे नाव मतदार यादीत शोधतात. ते बरोबर सापडले तर त्याला पोस्टल बॅलेट पेपर पाठविले जातात. हे पोस्टल बॅलेट संबंधित निवडणूक कर्मचाऱ्याच्या घरी पाठविले जाते. नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघात जवळपाससाडेएकोणवीस हजारावर पोस्टल बॅलेटसाठी कर्मचाऱ्यांनी अर्ज भरला. परंतु ४५० कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अर्जात दिलेली माहिती प्रचंड त्रुटीपूर्ण आणि चुकीची होती. बहुतांश लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर मतदार यादीत त्यांचे नाव शोधले असता, ते सापडले नाही. अशा एकूण ४५० लोकांचे अर्ज रद्द करण्यात आले आहे, याची माहिती त्यांना रीतसर देण्यात येणार आहे.उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमा करता येणारनिवडणूक कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक विभागाने मतदानापूर्वी दोन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयातच मतदानाची विशेष व्यवस्था केली होती. त्याचा काही जणांनी लाभ घेतला. ज्या कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट त्यांच्या घरी पाठविण्यात आले आहेत ते जमा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. रामटेकसाठी एसडीओ ग्रामीण तर नागपूरसाठी एसडीओ शहर कार्यालयात एक बॉक्स ठेवण्यात आला आहे. त्यात पोस्टल बॅलेट प्रत्यक्ष जमा करता येऊ शकते. पोस्टानेसुद्धा विभागात बॅलेट येत आहेत. २३ मेपर्यंत पोस्टल बॅलेट जमा करता येणार असले तरी कर्मचाऱ्यांनी एक दिवसापूर्वीच ते जमा केल्यास चांगले होईल, अन्यथा वेळेवर धावपळ होण्याची शक्यता आहे.

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Employeeकर्मचारी