शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

नकली पोलिसांचा नागपूरच्या असली पोलिसांना शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 09:38 IST

नकली पोलिसांनी सोमवारी सकाळी अडीच तासात सेवानिवृत्त अभियंता आणि बँकेच्या अधिकाऱ्यासह चौघांना लुटले. त्यांच्याजवळचे ४३ हजार रुपये आणि १ लाखाचे दागिने लुटून नेले. या घटनेमुळे पोलीस विभागही हादरले आहे.

ठळक मुद्देअडीच तासात चौघांना लुटले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नकली पोलिसांनी सोमवारी सकाळी अडीच तासात सेवानिवृत्त अभियंता आणि बँकेच्या अधिकाऱ्यासह चौघांना लुटले. त्यांच्याजवळचे ४३ हजार रुपये आणि १ लाखाचे दागिने लुटून नेले. या घटनेमुळे पोलीस विभागही हादरले आहे.आयकर कॉलनी येथील ६९ वर्षीय अनंत दहीगावकर हे सेवानिवृत्त बँक अधिकारी आहेत. ते सकाळी ९ वाजता फिरून पायी घरी जात होते. बजाजनगर पोलीस ठाणे हद्दीतील बुटी ले-आऊट येथे बाईकवर ३५ ते ४० वर्षे वयोगटातील दोन व्यक्तींनी त्यांना रोखले. त्यांनी स्वत:चा परिचय एक्साईज आॅफिसर म्हणून दिला. एकाने स्वत:चे ओळखपत्रही दाखविले. एका वृद्ध व्यक्तीजवळ गांजा सापडल्याचे सांगत तुम्हीसुद्धा वृद्ध आहात म्हणून तुमची तपासणी करायची असल्याचे सांगत पैसे आणि दागिने एका रुमालमध्ये काढून ठेवण्यास सांगितले. दहीगावकर यांनी तसेच केले. त्यांनी दागिने (दोन अंगठ्या) व ६५०० रुपये व घड्याळ आरोपीच्या स्वाधीन केली. आरोपींनी त्यांना घड्याळ व एक अंगठी परत केली; परंतु ३० हजार रुपयाची अंगठी लंपास केली. त्यांना रुमाल बांधून खिशात ठेवण्यास सांगितले. घरी आल्यावर दहीगावकर यांना दागिने लंपास केल्याचे समजले.दुसरी घटना सकाळी १०.३० वाजता सोनेगाव येथील मनीषनगरात घडली. परसोडी येथील ६५ वर्षीय पुंडलिक वाघमारे हे लहान भाऊ नामदेवसोबत दुचाकी दुरुस्त करण्यासाठी गॅरेजमध्ये जात होते. त्यांना २५ ते ३० वर्षे वयोगटातील युवकांनी रोखले. त्यांनी स्वत:ला पोलीस असल्याचे सांगत ‘आम्ही चरस-गांजा पकडला आहे. लोकांची चौकशी केली जात आहे. तुमचीही चौकशी करायची आहे’असे म्हणत पुंडलिक वाघमारेला अंगठी आणि चेन काढून रुमालमध्ये ठेवण्याचे नाटक केले. रिकामा रुमाल त्यांच्या स्वाधीन केला व दागिने घेऊन लंपास झाले.तिसरी घटना सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास प्रतापनगर पोलीस ठाणे हद्दीतील जयताळा मार्गावर घडली. भाऊसाहेब सुर्वे नगरनिवासी ६० वर्षीय भालचंद्र जैन हे महावितरणचे सेवानिवृत्त अभियंता आहेत. जैन हे बँकेतून घरी परत जात होते. रस्त्यात दोघांनी त्यांना रोखले. स्वत:ला पोलीस असल्याचे सांगितले. एका कपड्याच्या व्यापाऱ्याकडे गांजा सापडला आहे. त्यामुळे सर्वांची चौकशी सुरू आहे, असे म्हणत जैन यांची झडती घेऊ लागले. जैन यांचे ५० हजाराचे दागिने काढून रुमालमध्ये ठेवायला लावले. दागिने स्वत:कडे ठेवून खाली रुमाल परत केला. चौथी घटना सकाळी ११.४० वाजताच्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील कैलाशनगर येथे घडली. न्यू अमरनगर येथील दिलीप कावडकर सिंचन विभागात कर्मचारी आहेत. ते जलकर वसुली करून परत येत होते. न्यू कैलाशनगर मार्गावर त्यांना एका युवकाने रोखले. त्यानेही स्वत:ला पोलीस असल्याचे सांगत, समोर चरस-गांजाच्या तस्करांची चौकशी सुरू आहे. आम्हीही चौकशी करीत आहोत. तुमचीही झडती घ्यायची आहे, असे म्हणत झडती घेऊ लागला. दरम्यान त्याचा एक साथीदार आला. त्याने कावडकर यांच्याकडील वसुलीचे ४३ हजार रुपये लंपास केले.

टॅग्स :Policeपोलिस