शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

शिवसेना जिल्हा उपप्रमुख देवेंद्र गोडबोले ‘तडीपार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 22:42 IST

शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले यांच्याविरुद्ध पोलीस प्रशासनाने ‘तडीपार’ची कारवाई करीत त्यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेले गुन्हे आंदोलनकाळातील असून, दंगल घडविणे, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, शांतता व सुव्यवस्था भंग करणे आदींमुळे सदर कारवाई करण्यात येत असल्याचेही नोटीसमध्ये नमूद केले आहे. दुसरीकडे, ही राजकीय व्यक्तीविरुद्धची नागपूर जिल्ह्यातील अलीकडच्या काळात पहिलीच कारवाई असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देराजकीय वर्तुळात खळबळ : आंदोलनादरम्यान नोंदविले गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले यांच्याविरुद्ध पोलीस प्रशासनाने ‘तडीपार’ची कारवाई करीत त्यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेले गुन्हे आंदोलनकाळातील असून, दंगल घडविणे, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, शांतता व सुव्यवस्था भंग करणे आदींमुळे सदर कारवाई करण्यात येत असल्याचेही नोटीसमध्ये नमूद केले आहे. दुसरीकडे, ही राजकीय व्यक्तीविरुद्धची नागपूर जिल्ह्यातील अलीकडच्या काळात पहिलीच कारवाई असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.देवेंद्र गोडबोले यांना ही नोटीस उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ अन्वये बजावण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध मौदा पोलीस ठाण्यात भादंवि ३५३, ३४१, १४७, ३३२, ५० सहकलम १३५, १४३ सहकलम १३४, १३५, १०७, ११६ (३) अन्वये गुन्हे नोंदविले आहेत. एक प्रकरण न्यायप्रविष्ट असून, दोन प्रकरणांचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे.मौदा परिसरात दंगल पसरविणे, गैरकायद्याची मंडळी गोळा करणे, सरकारी कर्मचाºयांवर हल्ला करणे आदी कारणांमुळे गोडबोले यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. त्याअंतर्गत त्यांना अटकही करण्यात आली. मात्र, त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नाही. मौदा परिसरातील शांतता व सुव्यवस्था कधीही भंग होण्याची शक्यता असल्याने, त्यांना एक वर्षासाठी नागपूर शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी दिले आहे.गरिबांच्या हितासाठी लढत राहणारमी आजवर जीही उपोषण, मोर्चे, आंदोलने केली, ती लोकशाही मार्गानेच केली आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करण्यासाठी वेळोवेळी लढा उभारला आहे. अशाप्रकारच्या कितीही कारवाई माझ्याविरुद्ध केल्या तरी मी शेवटपर्यंत प्रकल्पग्रस्त व गरिबांच्या हितासाठी लढत राहणार आहे.देवेंद्र गोडबोलेमाजी जि.प. सदस्य.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीShiv Senaशिवसेना