नागपूर, दि. 22 - शिवसैनिकांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सोमवारी नागपूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आंदोलन केले. खासदार कृपाल तुमाने यांच्या नेतृत्तात हे आंदोलन करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली? किती शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले? किती शेतकऱ्यांना 10 हजार रुपये पीक कर्ज देण्यात आले ? यांसारख्या मागण्यांसाठी शिवसेनेनं नागपूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर आंदोलन केले. कर्जमाफीच्या मागणीबाबत एक निवेदन जिल्हा उपनिबंधक श्री. भोसले यांना शिवसेनेकडून देण्यात आले. शिवाय, ऑनलाईन अर्ज करताना बऱ्याच केंद्रावर शेतकऱ्यांकडून मनमानी पैसे घेण्यात येत असल्याची तक्रारदेखील शिवसेनेकडूनही करण्यात आली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश हरडे, संदीप इटकेलवार, राजेंद्र हरणे, युवा सेनाप्रमुख हर्षल काकडे, नागपूर शहर आणि जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
शेतक-यांसाठी खासदार कृपाल तुमानेंच्या नेतृत्वात शिवसैनिकांचं नागपुरात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 13:42 IST