शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दिमाखदार सोहळ्यात झाला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 00:04 IST

महालातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री शिवराज्याभिषेक समारोह समितीद्वारे सोमवारी सकाळी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला.

ठळक मुद्देभव्य पालखी शोभायात्रा व ढोलताशांचा गजर : सोहळ्यात जय भवानी जय शिवाजीचा गजर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महालातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री शिवराज्याभिषेक समारोह समितीद्वारे सोमवारी सकाळी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला.जय भवानी, जय शिवाजीचा गजर, ढोलताशांची गर्जना सोबतच भव्य पालखी यात्रा काढण्यात आली होती. ज्यात हजारो शिवभक्त हातात भगवा ध्वज घेऊन जयघोष करीत होते. शोभायात्रेच्या मार्गावर जागोजागी पुष्पवर्षा करण्यात येत होती. सकाळी ६ वाजता पालखी यात्रा काढण्यात आली. त्यानंतर अतिथींच्या उपस्थितीत महाराजांचे अभ्यंगस्नान करण्यात आले. १५१ महिलांतर्फे महाआरती करण्यात आली. या पालखी सोहळ्यादरम्यान मर्दानी आखाडातर्फे थरारक सादरीकरण करण्यात आले. यात लहान मुले व वृद्धांनीहीतलवारबाजीचे सादरीकरण केले. महालातील प्रत्येक चौकाला आकर्षक सजविण्यात आले होते. संपूर्ण परिसर भगवामय करण्यात आला होता. शिवरायांची शौर्य प्रकट करणारी प्रतिकृती साकारण्यात आली होती. आकर्षक रांगोळीने रस्ते सजविण्यात आले होते. यावेळी मुख्य अतिथी म्हणून राजे मुधोजी भोसले, कान्होजी आंग्रेचे वंशज संभाजीराजे आंग्रे, जितेंद्रनाथ महाराज, जयसिंगराजे भोसले, सुमंतजी टेकाडे आदी उपस्थित होते. दत्ता शिर्के, जय आस्कर, विजय राजूरकर, आशिष खडके, विक्की उतखडे, चेतन भोसले, विशाल देवकर, पंकज वाघमारे, दिलीप दिवटे, महेश महाडिक, विवेक पोहाणे आदींचे सोहळ्यात सहकार्य लाभले.५०० हुन अधिक वादकया कार्यक्रमात २५ पथकांनी ढोलताशाद्वारे एकास्वरात महाराजांना मानवंदना दिली. ५०० हून अधिक वादकांनी वाद्य वाजवून राज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात केली. सर्व कलावंत पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजnagpurनागपूर