शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

 शिवसेनेचा धनगर आरक्षणाला कायमच पाठिंबा, अहिल्याबाईंच्या कामाची मिळते पदोपदी साक्ष - नीलम गोऱ्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 17:46 IST

राज्यातील धनगर  समाजाने एकेकाळी मोठ्या प्रमाणात राज्य केले आहे. अहिल्या देवी होळकरांनी केलेल्या कामाच्या पाउलखुणा आजही सर्वत्र दिसत आहेत. त्यांच्या कामामुळे समाजाचा विकास होण्यास ख-या अर्थाने मदत झाली आहे. धनगर व धनगड या दोन्ही शब्दांत केवळ एकाच अक्षराचा फरक असून तो काढून टाकल्यास अनेक समाजघटकांना न्याय मिळू शकेल.

नागपूर : राज्यातील धनगर  समाजाने एकेकाळी मोठ्या प्रमाणात राज्य केले आहे. अहिल्या देवी होळकरांनी केलेल्या कामाच्या पाउलखुणा आजही सर्वत्र दिसत आहेत. त्यांच्या कामामुळे समाजाचा विकास होण्यास ख-या अर्थाने मदत झाली आहे. धनगर व धनगड या दोन्ही शब्दांत केवळ एकाच अक्षराचा फरक असून तो काढून टाकल्यास अनेक समाजघटकांना न्याय मिळू शकेल. शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांनी तर आर्थिक आरक्षण असावे असे सांगितले होते. आताही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी राज्यात धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला जाहीर पाठींबा देऊ केला आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विधान परिषदेत केले. परिषदेच्या सभागृहात नियम ९७ अन्वये धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आ. रामहरी रुपनवर यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेवर त्या बोलत होत्या. 

त्या म्हणाल्या, “अहिल्या देवी होळकर, मल्हारराव होळकर यांनी मराठी साम्राज्याचा केलेला विस्तार व समाज हिताच्या दृष्टीने केलेल्या अनेक योजना आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. त्यामुळेच ते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही थोर व्यक्तिमत्वे आज सर्व समाजाला आपली वाटतात. मंडल आयोगाने सादर केलेल्या अहवालानंतर देशात आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. या समाजाने त्यांच्या आरक्षणासाठी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलने केली आहेत.  आरक्षण मिळावे या मुद्द्यावरून समाजाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. १९५० ते २०१७ या ६७ वर्षातील ५५ वर्षे कॉंग्रेसचे राज्य या देशावर होते. परंतु या भोळ्या समाजाला कोणत्याही सुविधा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला नाही. मधल्या काळात जनता दलाच्या व्ही पी सिंगांच्या सरकारलाही या विषयी निर्णय घ्यावासा वाटला नाही. राजकीय इच्छाशक्ती नसल्यानेच हा समाज दुर्लक्षित राहिला आहे. धनगर समाजाच्या विकासाची मागणी केलेल्या महाराष्ट्राचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी केलेल्या कार्याची आज आठवण होते आहे. त्यांची कमतरता आजही सर्वांनाच भासत आहे. या आंदोलनाला यश मिळावे या करिता शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल.

धनगर ही या देशातील आती प्राचीन स्वतंत्र अस्तित्व असणारी विचार व आचार धारा आहे .धनगर ही संपूर्ण देशभर आढळणारी बहुभाषिक जमात आहे. आदिवासी वा इतर जातींच्या हिताला धक्का न लावता या समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे.”

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हे