शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Nagpur Monsoon Session: शिवसेना आणणार भाजपाला अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 20:49 IST

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजपाला आता काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरच सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या विरोधाचाही सामना करावा लागण्याचे संकेत आहेत. तसा इशारा शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पत्रकार परिषदेतून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांसोबतच सेनेशीही सामना करावा लागणार आहे.

ठळक मुद्दे शेतकरी, कायदा व सुव्यस्था, बुलेट ट्रेन, नाणार प्रकल्पावरून आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजपाला आता काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरच सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या विरोधाचाही सामना करावा लागण्याचे संकेत आहेत. तसा इशारा शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पत्रकार परिषदेतून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांसोबतच सेनेशीही सामना करावा लागणार आहे.नाणार प्रकल्पावरून मुख्यमंत्र्यांनी मंगळवारीच पत्रपरिषद घेऊन शिवसेनेला चूप केले होते. मात्र विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाणार प्रकल्पाबरोबरच भाजपाच्या इतरही विकासात्मक प्रकल्पावर ताशेरे ओढत अधिवेशनात शिवसेनेची वाटचाल कशी असेल ते स्पष्ट केले. बळीराजा अस्वस्थ आहे. ७० ते ८० टक्के शेतकऱ्यांना बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही. पीक कर्ज उपलब्ध झाले नाही. पीक कर्जाच्या नावावर शेतकरी महिलांची लैंगिक प्रताडणा होत आहे. यासंदर्भात शिवसेनेचे आमदार दोन्ही सदनातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार आहे. विशेष करून विदर्भातील धान, सोयाबीन, कापूस, तूर, दूध उत्पादन यावर शिवसेना आक्रमक राहणार आहे. त्याचबरोबर नागपूरसह राज्यभरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. अफवांच्या माध्यमातून मोठ्या घटना घडत आहे. गुन्हेगारांना गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात राजाश्रय मिळत आहे, हे मुद्दे शिवसेना प्रकर्षाने मांडणार आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, संभाजीनगरातील दंगल संदर्भात आवाज उचलण्यात येणार आहे. बँकेतून पळ काढलेल्या कर्जबुडव्यासंदर्भात शिवसेना आक्रमक आहे. पत्रपरिषदेला अनिल परब, सुनील प्रभू, रवींद्र पाठक आदी उपस्थित होते.नाणार नाही होऊ देणार नाणार प्रकल्पासंदर्भात स्थानिक कोकणवासीयांनी आपली भूमिका सरकारपुढे मांडली आहे. तरी सुद्धा सरकार या प्रकल्पासाठी आग्रही आहे. शिवसेनेची व पक्ष प्रमुखांची भूमिका स्पष्ट आहे. मुख्यमंत्री जरी प्रकल्पाचे समर्थन करीत असले तरी, आमचे जनतेमध्ये संख्याबळ अधिक आहे. कोकणात हा प्रकल्प होऊ देणार नाही, ही शिवसेनेची भूमिका कायम राहणार आहे. सोबतच बुलेट ट्रेनला ही आमचा विरोध आहे. जनतेचा विनाश करून विकास होत असेल तर, शिवसेनेला तो मान्य नाही, असे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.तीन तासांची प्रतीक्षा,मुख्यमंत्र्यांचे तीन मिनिटात उत्तर शिवसेनेच्या आमदारांना निधी वाटपात दुजाभाव होत असल्याची नाराजी व्यक्त करण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या कक्षात ठाण मांडले. तब्बल तीन तासांनी मुख्यमंत्री फडणवीस हे त्यांच्या भेटीसाठी आले. आपण शिवसेनेच्या आमदारांनाही भरीव निधी दिला आहे. पाहिजे असल्यास कुणाला किती निधी दिला याची माहिती मी स्वत: देईल. दोन दिवसांनी वित्त मंत्र्यांसोबत बैठक घेऊ, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी तीन मिनिटात दिले व बैठक संपली.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Shiv Senaशिवसेना