शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात यंदा शिवराज्याभिषेक सोहळा होणार ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 20:37 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा ४ जून रोजी येत आहे. नागपुरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासूनची आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा सोहळा अत्यंत सुनियोजित पद्धतीने ऑनलाईन पार पडणार आहे.

ठळक मुद्देफिजिकल डिस्टन्सिंग पाळून ‘कोविड योद्धा’ करतील पूजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा ४ जून रोजी येत आहे. नागपुरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासूनची आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा सोहळा अत्यंत सुनियोजित पद्धतीने ऑनलाईन पार पडणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या देशाचे आराध्य आहेत. महाराष्ट्रात तारखेनुसार ६ जूनला दरवर्षी रायगडावर तर तिथीनुसार दरवर्षी नागपुरातील गांधीद्वार येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा सोहळा श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या सावटामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे, अनेक सार्वजनिक सोहळे रद्द करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने परंपरा पाळली जावी आणि फिजिकल डिस्टन्सिंगही पाळली जावी, या हेतूने असे अनेक सोहळे ऑनलाईन पद्धतीने साजरे केले जात आहेत. त्याच धर्तीवर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळाही पार पडणार आहे. नागपुरात २० मेपासून या सोहळ्याला सुरुवात होत आहे. त्याअनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. त्यात निबंध लेखन, चित्रकला, शिवदुर्ग निर्माण स्पर्धा यांचा समावेश असणार आहे. तसेच शिवव्याख्यात्यांच्या व्याख्यानाचे आयोजन ऑनलाईनरीत्या करण्यात येणार आहे. ४ जूनला हा सोहळा वैदिक पद्धतीने पार पडेल. यंदा पोलीस, डॉक्टर, स्वच्छतादूत यांच्या हस्ते महाराजांचे पूजन करण्यात येणार आहे.कायदा आणि परंपरा दोन्ही पाळायच्या - दत्ता शिर्केकायदा पाळू तरच परंपरा व धार्मिक विधींना महत्त्व प्राप्त होते. आम्ही शिवरायांचे मावळे कायद्याला प्रथम स्थान देतो आणि म्हणूनच यंदा शिवराज्याभिषेक सोहळा गर्दीविना साजरा करण्याचे आवाहन करतो आहोत. त्याअनुसारच यंदा सर्व कार्यक्रमांचे आयोजन ऑनलाईन करण्यात येत असल्याची माहिती शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे संयोजक दत्ता शिर्के यांनी दिली.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजonlineऑनलाइनnagpurनागपूर