भरदिवसा मंदिरात चोरी

By Admin | Updated: September 9, 2016 03:15 IST2016-09-09T03:15:20+5:302016-09-09T03:15:20+5:30

दुर्गा मंदिरात भरदिवसा चोरी करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. चोरीचा हा प्रकार हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील

Shedding in the temple | भरदिवसा मंदिरात चोरी

भरदिवसा मंदिरात चोरी

आरोपीस अटक : सावंगीतील घटना
हिंगणा : दुर्गा मंदिरात भरदिवसा चोरी करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. चोरीचा हा प्रकार हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावंगी (देवळी) येथे बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली असून ग्रामस्थांच्या सतर्कतेने चोरीचा प्रयत्न अखेर फसला.
यादव महादेव वलके (२०, रा. साईराम चौक, वानाडोंगरी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास तो सावंगी (देवळी) गावाशेजारी असणाऱ्या दुर्गा मंदिरात गेला. तेथून काहीतरी वस्तू नेत असताना त्याला तेथील नागरिकांनी बघितले. नागरिकांना संशय आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले असता चांदीच्या मूर्तीसह घंटा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आरोपीने मंदिरात चोरी केल्याचे स्पष्ट होताच नागरिकांनी त्याला चोप दिला. ही माहिती हिंगणा पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक वैभव भगत, शिपाई कमलेश शाहू हे घटनास्थळी दाखल झाले. नंतर ग्रामस्थांनी आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्या ताब्यातून हिंगणा पोलिसांनी देवीच्या दोन मूर्ती, पितळी घंटा असा एकूण २५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (प्रतिनिधी)

Web Title: Shedding in the temple