शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ ११ महिने मृत्यूशी झुंजली अन्...उच्चविद्याविभूषित नवविवाहितेची छळकथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 22:27 IST

Nagpur News सुस्वरूप, उच्चशिक्षित तरुणीचा सासरच्या लोभी मंडळींनी बळी घेतला. करिश्मा साकेत तामगाडगे (वय २७) असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे.

ठळक मुद्देसासऱ्याने चौथ्या माळ्यावरून ढकलल्याचा होता आरोप

नागपूर : लग्नाच्या काही दिवसातच तिच्या गोडगुलाबी स्वप्नांचा चुराडा झाला. छळकथा सुरू असतानाच चौथ्या माळ्यावरून ती खाली पडली. गंभीर दुखऱ्या जखमा अन् बधिर शरीर घेऊन ती तब्बल ११ महिने मृत्यूशी झुंजली. अखेर रविवारी ७ नोव्हेंबरला तिने मृत्यूपुढे हात टेकले. एक सुस्वरूप, उच्चशिक्षित तरुणीचा सासरच्या लोभी मंडळींनी बळी घेतला. करिश्मा साकेत तामगाडगे (वय २७) असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे.

कॉम्प्युटर इंजिनिअर असलेल्या करिश्माचे न्यू नरसाळा मार्गावर शारदा कॉम्प्लेक्समध्ये राहणारा आरोपी साकेत भीमराव तामगाडगे याच्यासोबत लग्न झाले होते. साकेत सॉफ्टवेअर डेव्हलपर असून तो पुण्याच्या एका आयटी कंपनीत नोकरीला असल्याचे लग्नापूर्वी सांगण्यात आले होते. त्याचे वडील भीमराव तामगाडगे निवृत्त अधिकारी आहेत. सुखवस्तू कुटुंबात आपल्या मुलीचे लग्न होत असल्याच्या विचाराने तिच्या आईने थाटामाटात लग्न लावून दिले. मात्र, लग्नात मनासारखे आंदण मिळाले नाही म्हणून आरोपी साकेत, त्याचे वडील भीमराव, आई ललिता तसेच बहीण प्राची आणि तिचा नवरा राहुल हे सर्व करिश्माचा छळ करू लागले. त्यामुळे करिश्माच्या स्वप्नाचा चुराडा झाला होता.

अशात लग्नाला अवघे तीन महिने झाले असतानाच २३ डिसेंबरला सायंकाळी ४ च्या सुमारास करिश्मा चौथ्या माळ्यावरील सदनिकेच्या बाल्कनीतून खाली पडली. आरोपी सासऱ्याने तिला धक्का देऊन खाली पाडल्याचा यावेळी पोलिसांना दिलेल्या बयाणात आरोप लावला होता. गंभीर जखमी करिश्माचे हुडकेश्वर पोलिसांनी बयाण नोंदवून आरोपी साकेत, त्याचे वडील, आई आणि बहीण तसेच बहीण जावयाविरुद्ध हुंड्यासाठी छळ करून करिश्माला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, ११ महिन्यांपासून असह्य दुखने घेऊन करिश्माने मृत्यूशी झुंज दिली. रविवारी सकाळी तिने मृत्यूसमोर हात पत्करली. एम्सच्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

आईचे विश्वच हरवले

लग्नापूर्वी हुंडा नकोच, म्हणत लॉकडाऊनच्या काळात आरोपी तामगाडगे कुटुंबीयांनी घाईघाईत लग्न जुळविले. लग्न झाल्यानंतर मात्र मनासारखे आंदण मिळाले नाही म्हणून त्यांनी करिश्माला अवघ्या चारच महिन्यात मृत्यूच्या जबड्यात लोटले. करिश्माच्या जाण्यामुळे तिच्या माहेरची मंडळी कमालीची व्यथित झाली आहे. तिच्या आईचे तर विश्वच हरवले आहे. हुडकेश्वर पोलीस या प्रकरणात आता काय कारवाई करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

---

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी