शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

‘लिव्हर’ देऊन तिने विणला मायेचा धागा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 01:15 IST

राखीपौर्णिमेला बहिण मायेचा धागा बांधते. तेव्हा लाडक्या बहिणीला भाऊही गिफ्ट देतो. पण, भावासमोरच काळ उभा होता. स्वत:च्या जीवावर उदार होत तिने मोठ्या भावाला यकृत दान केले अन् मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. १५ दिवसाच्या उपचारानंतर भाऊ आणि बहीण रक्षाबंधनाच्या पर्वावर आज हॉस्पिटलमधून घरी परतले. रविवारी ती त्याला ओवाळणार, राखी बांधणार. नेहमीप्रमाणे बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी तो घेणार. पण त्याच्या जीवाची रक्षा आधीच बहिणीने केली असल्याचे त्याला माहीत नसणार? कारण तिला भाऊ हवाय!

ठळक मुद्दे‘राखी’ची बहिणीकडून भावाला अनोखी भेट : ‘लाईव्ह डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट’

 

सुमेध वाघमारे

लोकमत  न्यूज नेटवर्क

नागपूर : राखीपौर्णिमेला बहिण मायेचा धागा बांधते. तेव्हा लाडक्या बहिणीला भाऊही गिफ्ट देतो. पण, भावासमोरच काळ उभा होता. स्वत:च्या जीवावर उदार होत तिने मोठ्या भावाला यकृत दान केले अन् मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. १५ दिवसाच्या उपचारानंतर भाऊ आणि बहीण रक्षाबंधनाच्या पर्वावर आज हॉस्पिटलमधून घरी परतले. रविवारी ती त्याला ओवाळणार, राखी बांधणार. नेहमीप्रमाणे बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी तो घेणार. पण त्याच्या जीवाची रक्षा आधीच बहिणीने केली असल्याचे त्याला माहीत नसणार? कारण तिला भाऊ हवाय!अडचणीत नेहमीच आपल्यासोबत असणारा, साथ न सोडणारा, समजुतदार प्रेमळ असा भाऊ असावा, असे बहिणींना वाटते आणि एखादी भोळीभाबडी, सुंदर मनाची,खट्याळ-खेळकर अशी बहीण असावी, असे भावाला वाटते. अनेकांच्या या इच्छा पूर्णही होतात. परंतु काळ येतो आणि दोघांची परीक्षा घेतो, तेव्हा भावाचे निरागस ‘प्रेम’ आणि बहिणीची अफाट ‘माया’चे वास्तव समोर येते. २३ वर्षीय निकिताच्यासमोरही काळ आला होता. तिने भावावरची अफाट माया सिद्ध करून दाखवली.निकिताचा भाऊ प्रणय कुºहाडकर (२४) याचे यकृत निकामी झाल्याचे डॉक्टरांनी निदान केले. तातडीने यकृत प्रत्यारोपण न झाल्यास जीवावर बेतू शकते, असा इशाराही दिला. गरीब कुटुंबावर दु:खाची कुºहाड कोसळली. आजारातून सुखरूप बाहेर पडू, अशी आशाच प्रणयने सोडून दिली होती. याची माहिती मित्रांपर्यंत पोहचताच पैशांची जुळवाजुळव सुरू झाली. यकृतदानासाठी आईने पुढाकार घेतला. परंतु रक्तगट जुळत नव्हता. काय करावे या विवंचनेत असताना लहान बहीण निकिता समोर आली. मी देते यकृत, एवढेच ती म्हणाली, घरच्यांनी तिला चूप केले. तुझे लग्न व्हायचे आहे, जीवाला काही झाले तर.नको म्हणून नातेवाईकांनी डॉक्टरांना दुसरा पर्याय सुचविण्याची विनंती केली. डॉक्टरांनी निकिताच पर्याय असल्याचे स्पष्ट केले. आम्हा दोघांना काहीच होणार नाही, हे निकिताने पटवून दिले. पण एक अटही टाकली.न्यू इरा हॉस्पिटलमध्ये मध्यभारतातील पहिलेच हे‘लाईव्ह डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट’ झाले. १५ दिवसाच्या उपचारानंतर शनिवारी हे दोघेही भाऊ-बहीण रुग्णालयातून घरी परतले. परंतु आजही भावाला आपला जीव बहिणीमुळे वाचला, हे माहीत नाही. त्याला हे सांगू नका हीच त्या बहिणीची अट होती. तिला त्याचे भाऊपण हिरावून घ्यायचे नाही, म्हणून तिचा खटाटोप आजही सुरू आहे. उद्या ती त्याला राखी बांधणार आणि नेहमीसारखा तो रक्षणाची जबाबदारी घेणार...तिलाही हेच हवे आहे.

 

टॅग्स :Organ donationअवयव दानnagpurनागपूर