शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

ती लढली, ती जिंकलीही ...

By admin | Updated: March 9, 2016 03:18 IST

जगावेगळे काहीतरी करण्याचा ‘तिचा’ संकल्प होता. यासाठी ‘तिने’ हरितगृह उभारले. यासाठी बॅँकेचे कर्ज घेतले.

हरितगृहाचे वादळ ग्राहक मंचात : लताच्या संघर्षाचा विजयजितेंद्र ढवळे नागपूरजगावेगळे काहीतरी करण्याचा ‘तिचा’ संकल्प होता. यासाठी ‘तिने’ हरितगृह उभारले. यासाठी बॅँकेचे कर्ज घेतले. मात्र निसर्गाने लताच्या स्वप्नावर पाणी फेरले. कर्जाचा डोंगर समोर असताना विमा कंपनीने दावा नाकारला. बँकेनेही हात वर केले. पण लताचा यात दोष नव्हता. तिची फसवणूक झाली होती. पण ती खचली नाही. न्यायासाठी तिने हरितगृहाचा वादळी संघर्षाचा प्रवास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे पोहोचविला. मंचानेही लताचा संघर्ष आणि तिने सादर केलेले पुरावे विचारात घेता प्रतिवादी बँकेला दंड ठोठावत लताला ९ टक्के व्याजासह नुकसानभरपाईचे आदेश दिले. जागतिक महिला दिनाच्या पर्वावर लता या संघर्षाला सलाम! प्रकरण असे की, लता कट्यारमल यांनी महाराष्ट्र हॉर्टिकल्चर अ‍ॅण्ड मेडिसिनल प्लँट मंडळाच्या योजनेंतर्गत हरितगृह उभारण्यासाठी आयडीबीआय बँकेच्या धरमपेठ शाखेकडून ९ लाख रुपयांचे कर्ज घेतले. यासोबचत स्वत:जवळीतील काही रक्कम टाकून मौजा आमगाव (हिंगणा) येथील शेतजमिनीवर हरितगृहाची उभारणी केली. या कर्जाच्या सुरक्षेसाठी तिने आयडीबीआय बँकेकडे शेतजमिनीचे गहाणखत करून दिले. यानंतर बँकेने कर्जाच्या सुरक्षेसाठी लता यांच्याकडून ४ हजार घेत युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडून आॅक्टोबर २०१२ मध्ये विमा काढून घेतला. मात्र या विम्याची सविस्तर माहिती लता यांना बँकेकडून पुरविण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी याचिकेतून केला आहे. बँकेने केली लताची दिशाभूल नागपूर : बँकेने त्यांना विम्याची प्रतही दिली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. १७ मे २०१३ रोजी हिंगणा परिसरात झालेल्या वादळाचा फटका लता यांच्या हरिगृहालाही बसला. यात त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पण विमा काढल्याने भरपाई मिळेल या आशेने लता यांनी बँकेच्या व्यवस्थापकाला वादळामुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली. यानंतर बँकेने नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे दावा सादर करण्यास सांगितले. बँकेच्या सांगण्यानुसार लता यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे नागपूर विभागीय कार्यालय गाठले. पण तिथे त्यांना कळले की आपली फसवणूक झाली आहे. यानंतर लता यांनी कृषी विभागाच्या अहवालाचा आधार घेत विमा कंपनीकडे हरितगृहाच्या नुकसानाबाबत लेखी कळविले. यावर विमा कंपनीने त्यांना नुकसानभरपाई दाव्याचा अर्ज दिला. यानंतर कंपनीचे सर्वेयर संतोष कुळकर्णी यांनी क्षतिग्रस्त हरितगृहाची पाहणी करीत नुकसानाचे मूल्यमापन केले. इतका खटाटोप केल्यानंतर विमा कंपनीने त्यांचा दावा फेटाळून लावला. यात विमा कंपनीने लता यांनी काढलेला विम्यात वादळ अथवा गारपिटीने नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळेल असा विमा त्यांनी काढलेला नव्हता. बँकेनेही त्यांना विमा काढताना यासंदर्भात अवगतही केले नव्हते. शेवटी लता यांना बँकेकडून दिशाभूल झाल्याचे लक्षात आले.