शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांचाच! फडणवीसांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 06:07 IST

ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठा आरक्षणाचा इतिहास काढून बघितला तर सर्वात मोठा विरोध शरद पवार यांनीच केला आहे. त्यांना वारंवार संधी मिळाली. मनात आणले असते तर मंडल आयोग लागू झाला तेव्हाच शरद पवार यांनी मराठा आरक्षण दिले असते, पण त्यांनी दिले नाही. शरद पवार यांना केवळ विविध समाजांना झुंजवत ठेवण्यातच जास्त रस आहे. लोक झुंजत राहिले तर नेतेपद राहील, ही त्यांची राजकारणाची पद्धत असल्याची टीका  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूर येथे आयोजित भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. 

लोकसभा-विधानसभा महायुतीत एकत्रचnमहाविजय २०२४ हे आपले ध्येय आहे. विजयाची भावना घेऊनच आपण मैदानात उतरणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मेहनत करतात, त्यांना साजेसे काम करायचे आहे. तेव्हा पुढचे ९-१० महिने पक्षासाठी द्यावे लागतील. जागांची चिंता करू नका, तुमच्या मनात जेवढ्या जागा आहेत, तेवढ्या जागा मिळणारच आहेत. nलोकसभा-विधानसभा दोन्ही निवडणुका आपल्याला भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीतच लढवायच्या आहेत. तेव्हा भाजपेतर जागेवर जो निवडून येईल तो उमेदवार मोदींनाच पाठिंबा देणार आहे. तेव्हा ४८ लोकसभा मतदारसंघात उतरायचेय आणि विजय मिळवायचाय, असे आवाहन भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.

राहुल गांधी ईश्वराने भाजपला वरदानकाँग्रेस नेते राहुल गांधी हे ईश्वराने आपल्याला दिलेले वरदान आहे. विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा. काँग्रेसने केवळ स्वत:चा विचार केला. नेते मोठे झाले पक्ष लहान झाला, अशी टीका त्यांनी केली.

विरोध केल्याचे सिद्ध करा : जितेंद्र आव्हाड nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कुठेही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केलेला नाही किंवा तसे वक्तव्य केले नाही.nपवारांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्याचे सिद्ध करा, असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले.­

आठवा, सुप्रिया सुळे  काय म्हणाल्या होत्यामहाविकास आघाडीची सत्ता असताना सुप्रिया सुळे म्हणायच्या की, राज्यात मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? भाजपचे सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण मिळाले. आपले पण सरकार गेल्यानंतर मराठा आरक्षणावर स्थगिती आली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करेल. पण कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. हे भाजपचे वचन आहे. आपण निवडणुकीच्या निकालाचा विचार करून कोणत्याही समाजाबाबत निर्णय घेत नाही.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षण