शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात राममंदिरासाठीच्या ‘हुंकार’चा शंखनाद महाआरतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 21:23 IST

अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेतर्फे वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. याअंतर्गतच येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगळुरू तसेच नागपुरात हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या हुंकार सभेचा शंखनाद शनिवारी नागपुरात दोन ठिकाणी महाआरतीच्या माध्यमातून करण्यात आला.

ठळक मुद्देअभाविप, भाजयुमो, विहिंपचे आयोजन : शहरात दोन ठिकाणी एकवटले कार्यकर्ते

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेतर्फे वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. याअंतर्गतच येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगळुरू तसेच नागपुरात हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या हुंकार सभेचा शंखनाद शनिवारी नागपुरात दोन ठिकाणी महाआरतीच्या माध्यमातून करण्यात आला.राममंदिरासाठी वातावरणनिर्मिती करण्यासाठी अयोध्या, बंगळुरू व नागपुरात हुंकार सभा होणार आहेत. २५ नोव्हेंबर रोजी नागपुरात हनुमान नगर येथील क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात ही सभा होणार आहे. नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने येथून देशात संदेश जाणार आहे. संघभूमीत होणाऱ्या सभेसाठी नागपूरसह सहा लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्ते येणार आहेत. विशेष म्हणजे भाजप आमदारांसह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधीदेखील सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर संघ परिवारातील विविध संघटना कामाला लागल्या आहेत.या सभेबाबत वातावरणनिर्मिती करण्यासाठी तसेच संकल्प घेण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे पोद्दारेश्वर राममंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ५.३० वाजता झालेल्या या महाआरतीला अभाविपसह विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. तर सायंकाळी ६ वाजता भारतीय जनता युवा मोर्च्यातर्फे रामनगर येथील हनुमान मंदिरातदेखील महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळीदेखील संघ परिवारातील विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.रविवारी आमदारांची बैठकदरम्यान, या सभेसाठी भाजपालादेखील विशेष ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. या सभेला कमीत कमी १ लाख लोक यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात आमदारांची बैठक १८ नोव्हेंबर रोजी रेशीमबाग स्थित हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात होणार आहे. या बैठकीला शहरासोबतच जिल्हा तसेच प्रांतातील आमदार अपेक्षित आहेत. या बैठकीत सभेचे नियोजन, व्यवस्था त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांची व्यवस्था इत्यादीसंदर्भात सखोल चर्चा होईल.

टॅग्स :Maha ArtiमहाआरतीRam Mandirराम मंदिर