शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

कोरोनाच्या सावटातही होणार ‘अखंड ज्योत’ प्रज्वलित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 10:52 IST

तज्ज्ञ पुरोहितांकडून होम, हवन, यज्ञाचे आयोजन केले जाऊन कोरोनाचे संकट घालविण्याची व विश्वाला संकटातून मुक्त करण्याची प्रार्थनाही केली जाणार आहे.

ठळक मुद्दे मंदिर व्यवस्थापनांकडून भाविकांना गर्दी टाळण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या महाभयंकर सावटात गर्दी टाळण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू झाली आहे. त्याअनुषंगाने धार्मिक प्रार्थनास्थळेही बंद करण्यात आली आहेत. अशा स्थितीत बुधवारपासून सुरू होत असलेल्या चैत्र नवरात्रोत्सवही भाविकांच्या गर्दीशिवाय साजरा होत आहे. मंदिर प्रशासनांकडून खबरदारी घेतली जात असून, भाविकांना त्यांच्या अखंड मनोकामना ज्योती प्रज्वलित करण्यासाठी विशेष व्यवस्थाही केली जात आहे.हिवाळ्यात येणाऱ्या अश्विन नवरात्राप्रमाणेच देवीच्या सर्व देवालयांमध्ये चैत्र नवरात्रोत्सवाची धूम असते. अखंड ज्योत प्रज्वलित केल्या जात असतात आणि त्या भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. मात्र, यंदा भाविकांना आपल्या मनोकामना ज्योत प्रज्वलित करण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून वेगळ्या तºहेचे आवाहन केले जात आहे. भाविकांनी अखंड ज्योतीसाठी निश्चित निधी प्रशासनाकडे अर्पण करून घरूनच देवीची आराधना करण्याचे आवाहन केले जात आहे. मंदिरांमध्ये पुरोहित आणि काही नेमलेल्या व्यक्तींकडेच अखंड ज्योतींची देखरेख करण्याची योजना करण्यात आली आहे. यासोबतच तज्ज्ञ पुरोहितांकडून होम, हवन, यज्ञाचे आयोजन केले जाऊन कोरोनाचे संकट घालविण्याची व विश्वाला संकटातून मुक्त करण्याची प्रार्थनाही केली जाणार आहे.ज्यांचा देवावर विश्वास त्यांनी महामृत्यूंजय जपावा - वैद्य: मानवाच्या अतिवादी वृत्तीमुळे सध्याचे संकट ओढवले आहे. त्यामुळे निसर्ग कोपला आहे. आपण निसर्गालाच भगवंत मानतो आणि जन्म आणि मृत्यूचा फेरा त्याच निसर्गाच्या अर्थात शिवतत्त्वात पूर्ण होतो. सध्याचे कोरोनाचे सावट, त्यातलाच एक भाग आहे. जो व्यक्ती यावर विश्वास ठेवतो त्याने या काळात महामृत्यूंजन महामंत्राचा जप करावा. सोबतच विष्णूसहस्त्रनाम ऐकत राहावे. हे सर्व मोबाईलवर डाऊनलोड होत असल्याने सहज उपलब्ध होत असल्याचे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavratriनवरात्री