शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात शाळकरी मुलाचे लैंगिक शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 16:08 IST

आॅटोचालकाने दोन वर्षांपासून एका शाळकरी मुलाचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. राजेंद्र पांडुरंग ससाने (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली.

ठळक मुद्देआईवडिलांना जीवे मारण्याची धमकी : आरोपी आॅटोचालक गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅटोचालकाने दोन वर्षांपासून एका शाळकरी मुलाचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. राजेंद्र पांडुरंग ससाने (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली.पीडित मुलगा १३ वर्षांचा आहे. हा मुलगा आणि आरोपी आॅटोचालक सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वावलंबीनगरात राहतात. मुलाला दोन ते तीन वर्षांपासून शाळेत नेण्याचे आणि शाळेतून घरी आणण्याचे काम आरोपी आॅटोचालक ससाने करायचा. १ जुलै २०१६ ला शाळेतून परत येत असताना आरोपी ससाने याने निर्जन ठिकाणी आॅटो उभा करून पीडित मुलावर अत्याचार केला. यावेळी त्याला ससानेने धाक दाखवून गप्प बसण्यास सांगितले. मुलगा भीतीमुळे गप्प राहिला. त्यामुळे आरोपी ससाने निर्ढावला. पुढे तो मनात येईल तेव्हा पीडित बालकाचे लैंगिक शोषण करू लागला. कधी वडिलांना, कधी आई तर कधी बहिणीला जीवे ठार मारेन, अशी धमकी देऊन तो पीडित मुलावर अत्याचार करीत होता. त्याने विरोध केल्यास तो त्याला मारहाण करायचा. तब्बल दोन वर्षांपासून त्याचा हा अत्याचार पीडित बालक सहन करीत आहे. ११ एप्रिलला त्याने अशाच प्रकारे मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केले. विरोध केला असता मारहाण केली. त्याच्या पाशवी अत्याचाराने मुलाला जखम होऊन रक्तस्राव झाला. त्याची प्रकृती बिघडल्याने पालकांनी त्याला खासगी इस्पितळात दाखल केले. तपासणीनंतर डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पीडित बालकाला विचारणा केली असता त्याने आपली कैफियत सांगितली. आईवडिलांना आरोपी जीवे मारण्याचा धाक दाखवत असल्याने गप्प होतो, असेही स्पष्ट केले. डॉक्टरांनी ही बाब बालकाच्या पालकांना सांगितली. त्यानंतर ही संतापजनक घटना उजेडात आली. पालकांनी त्याला शनिवारी सोनेगाव पोलीस ठाण्यात नेले. बालकाने दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचार तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. 

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाnagpurनागपूर