शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  घटस्फोटित महिलेचे लैंगिक शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 14:58 IST

घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत दोन वर्षे शरीरसंबंध जोडल्यानंतर एका आरोपीने आता दुसऱ्याच एका तरुणीसोबत लग्न जोडले आहे. तो वाऱ्यावर सोडत असल्याचे पाहून पीडित महिलेने प्रतापनगर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देआरोपीची आता दुसरीशी लग्नाची तयारी : प्रतापनगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत दोन वर्षे शरीरसंबंध जोडल्यानंतर एका आरोपीने आता दुसऱ्याच एका तरुणीसोबत लग्न जोडले आहे. तो वाऱ्यावर सोडत असल्याचे पाहून पीडित महिलेने प्रतापनगर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. विशाल प्रमोद वानखेडे (वय ३०) असे आरोपीचे नाव असून तो प्रतापनगरातील नागोबा मंदिराजवळच्या संभाजी चौकात राहतो.पीडित महिला ३४ वर्षांची आहे. ती एमआयडीसीत खासगी नोकरी करते. ती घटस्फोटित असून तिला एक मुलगी आहे. दोन वर्षांपूर्वी विशाल तिच्या संपर्कात आला. तो मूळचा कोंढाळीतील रहिवासी आहे. त्याने तिला लग्न करून मुलीसह स्वीकारण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर या दोघांचे शरीरसंबंध प्रस्थापित झाले. तेव्हापासून ते पती-पत्नीसारखेच वागत होते. मध्यंतरी कामाच्या निमित्ताने विशालने तिला पैसे मागितले. तिने सहजपणे पैसे दिल्यानंतर तो नेहमीच तिला पैसे मागू लागला. साधारणत: एक लाख रुपये त्याने या महिलेकडून घेतले. दरम्यान, २४ मार्च २०१६ पासून तो २१ मार्च २०१८ पर्यंत त्यांच्यात चांगले संबंध होते. अलिकडे विशाल दुसºयाच मुलीसोबत लग्नाच्या तयारीत असल्याचे कळाल्याने तिने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. तो टाळाटाळ करीत असल्याने त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर महिलेसोबत त्याने संबंध तोडले. तो कोंढाळीला जाऊन राहू लागला. ते पाहून महिलेने कोंढाळी गाठली. येथे पुन्हा त्यांच्यात वाद झाला. १२ एप्रिलला त्याने दुचाकीने धडक दिल्यामुळे महिलेला दुखापत झाली. महिलेने त्यासंबंधाने तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तिला दाद दिली नाही. त्यामुळे नंतर ती नागपुरात भरोसा सेलला गेली. तेथून प्रतापनगर ठाण्यात पोहचली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.नातेवाईकाने केला महिलेवर बलात्कारभाड्याने रूम मिळवून देण्याच्या बहाण्याने लॉजवर नेऊन आरोपी नातेवाईकाने एका महिलेवर पाशवी बलात्कार केला. साबिर अब्दुल गफार (वय २९) असे आरोपीचे नाव असून तो मोमीनपुऱ्यातील रहिवासी आहे. पीडित महिला (वय २१) दुर्ग (छत्तीसगड) येथील रहिवासी आहे. पतीशी वितुष्ट आल्यानंतर ती एकटीच रोजगाराच्या निमित्ताने नागपुरात आली. येथे एका खाद्यान्न बनविणाऱ्या कारखान्यात ती काम करते. सध्या ती मैत्रिणीसोबत सीताबर्डीतील एका गेस्ट हाऊसमध्ये राहते. तेथील भाडे परवडणारे नसल्याने ती रूमच्या शोधात होती. आरोपी साबिर हा नातेवाईक असल्यामुळे त्याचा मोबाईल क्रमांक मिळवून तिने त्याच्याशी संपर्क केला. त्याला भाड्याची खोली मिळवून देण्याची विनंती तिने केली. २३ मार्चच्या रात्री ७ वाजता त्याने तिला रूम दाखवतो, असे म्हणून जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिफ्रेश पॉर्इंट लॉजच्या पहिल्या माळ्यावरील एका खोलीत नेले. तेथे तिचे तोंड दाबून तिच्यावर पाशवी अत्याचार केला. या घटनेमुळे मानसिक अवस्था बिघडल्याने महिला बरेच दिवस गप्प बसली. त्यानंतर तिने दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी जुनी कामठी पोलिसांनी साबिरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Rapeबलात्कारnagpurनागपूर