शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, साेशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 12:58 IST

त्याने बदनामी करण्याची धमकी देत दाेनदा त्याच्या घरी बाेलावून तिच्यावर अतिप्रसंगही केला.

ठळक मुद्दे आरोपी अटकेत : सावनेर शहरातील घटना

सावनेर (नागपूर) : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न केल्याचा देखावा करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सावनेर शहरात नुकतीच घडली. या प्रकरणातील आराेपीस अटक करण्यात आली असून, त्याने साेशल मीडियाच्या माध्यमातून तिची बदनामी केल्याचेही उघड झाले आहे.

राजा स. फुले (२३, रा. वाॅर्ड क्रमांक ४, श्री साईनगर, गुजरखेडी, सावनेर), असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. त्याची १७ वर्षीय मुलीशी ओळख झाली होती, त्याने तिच्याशी सप्टेंबर २०१९ मध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर १५ ऑगस्ट २०२० राेजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तिला स्वत:च्या घरी बाेलावून बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. एवढेच नव्हे तर त्याने जबरदस्तीने तिच्या गळ्यात हार टाकून साेबत फाेटाेही काढले.

पुढे त्याने बदनामी करण्याची धमकी देत दाेनदा त्याच्या घरी बाेलावून तिच्यावर अतिप्रसंगही केला. त्यानंतर त्याने साेमवारी (दि.६) तिचे गळ्यात हार टाकलेले फाेटाे व अश्लील मॅसेज साेशल मीडियावर पाेस्ट व व्हायरल करून तिची बदनामी केली. शिवाय, तिच्या वडिलांना अश्लील शिवीगाळ केली. परिणामी, तिने पाेलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी विविध कलमांसह, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ सहकलम ४, ५ (एल), बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ३ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक गेडाम करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगArrestअटकsavner-acसावनेर