शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

कोलकाता येथील सेक्स वर्करला सोडले : छत्तीसगडच्या मायाचे जाल उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 20:59 IST

वर्धा मार्गावरील रॅडिसन ब्ल्यू या पंचतारांकित हॉटेलमध्ये सोमवारी रात्री पोलिसांनी छापा घालून तेथे चालणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला. या कारवाईमुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पंचतारांकित हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या महिलेला मंगळवारी कोर्टात हजर करून तिचा १० जानेवारीपर्यंत पीसीआर मिळवला.

ठळक मुद्दे१० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीनागपूरच्या हॉटेल रॅडिसनमधील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा मार्गावरील रॅडिसन ब्ल्यू या पंचतारांकित हॉटेलमध्ये सोमवारी रात्री पोलिसांनी छापा घालून तेथे चालणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला. या कारवाईमुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पंचतारांकित हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या महिलेला मंगळवारी कोर्टात हजर करून तिचा १० जानेवारीपर्यंत पीसीआर मिळवला.मूळची भिलाई (छत्तीसगड) मधील रहिवासी असलेली माया नागपुरातून मध्यभारतात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालविते. धनिकबाळ आणि आंबटशौकीन ग्राहकांना ती देश-विदेशातील वारांगना पुरविते. गुन्हे शाखेला ही माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी मायाला पकडण्याची योजना आखली. त्यानुसार बनावट ग्राहकाने मायासोबत सोमवारी संपर्क साधला. मायाने १० हजार रुपये एकावेळेचा दर सांगून त्याला कोलकाता येथील वारांगना उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली. ग्राहकाकडून तिने पाच हजार रुपये अ‍ॅडव्हान्स तसेच रूममध्ये जाण्यापूर्वी पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर मायाने ग्राहकाला रात्री १० वाजता हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये बोलवले. ठरल्याप्रमाणे ग्राहक तेथे पोहचताच त्याला रूम नंबर २०२ मध्ये पाठविले. रुममध्ये कोलकाताची वारांगना होती. ग्राहकाने पोलिसांना संकेत देताच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने रूम नंबर २०२ मध्ये छापा घातला. तेथे वारांगनेला तसेच दलाल मायाला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी हॉटेलमध्ये ठिकठिकाणचे पाहुणे होते. येथे पोलिसांनी छापा घालून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट पकडल्याचे लक्षात आल्याने हॉटेल प्रशासन तसेच पाहुण्यांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी ज्या रूममध्ये वेश्याव्यवसाय चालत होता, त्या रूमची कसून तपासणी करून तेथून काही आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या.तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणारी महिला दलाल माया ऊर्फ पूजा गोपाल राव (वय ३२) हिला अटक केल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले. मायाच्या आंतरराष्ट्रीय हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचे मायाजाल सर्वत्र पसरले असून, त्याची सविस्तर माहिती मिळवायची असल्याचे सांगून पोलिसांनी न्यायालयातून मायाचा १० जानेवारीपर्यंत पीसीआर मिळवला.१५ दिवसांचा होता करारपोलिसांनी रॅडिसन ब्ल्यूच्या रूम नंबर २०२ मध्ये पकडलेली सेक्स वर्कर पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यातील (कोलकाता जवळ) रहिवासी आहे. मायाने १५ दिवसांच्या देहविक्रयाच्या करारावर नागपुरात बोलवून घेतल्याचे तिने पोलिसांना सांगितल्याचे समजते. २० डिसेंबरला ती नागपुरात आली. मायाने तिची व्यवस्था आधी हरदेव हॉटेलमध्ये केली होती. तेथे १० दिवस मुक्काम केल्यानंतर तिला रॅडिसन हॉटेलमध्ये पाठविले. रुम नंबर २०२ ची बुकिंगही मायानेच केली होती, हे पोलीस तपासात स्पष्ट झाल्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी लोकमतला सांगितले. प्राथमिक चौकशीनंतर या सेक्स वर्करची रवानगी पोलिसांनी करुणा सुधारगृहात केली आहे.ते कोण होते ?माया गेल्या चार ते पाच वर्षांपासून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविते. पोलिसांनी तिच्याकडून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये एक विशिष्ट स्वरूपाचे फोल्डर पोलिसांना आढळले. त्यात मुंबई, पुण्यासह विविध प्रांतातील हायप्रोफाईल सेक्स वर्करची यादी आणि त्यांचे फोटो पोलिसांना सापडले. याच फोल्डरमध्ये मायाकडे नेहमी सेक्सवर्कर मागविणाऱ्या नागपूर, विदर्भातील काही धनीकबाळ आणि आंबट शौकिनांचीही मोठी यादी आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेट