शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रोफेशनल सलूनच्या नावाखाली देहव्यापार; पोलिसांचा छापा, आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 12:38 IST

फॅमिली सलूनच्या नावावर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून एका आरोपीला अटक केली.

ठळक मुद्देहायप्रोफाइल सेक्स रॅकेट

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : फॅमिली सलूनच्या आडून हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या आरोपीला सामाजिक सुरक्षा विभागाच्या (एसएसबी) पोलिसांनी अटक केली. रवि दशानन चाैधरी असे आरोपीचे नाव असून, तो चुनाभट्टी अजनीतील एफसीआय गोदामाच्या बाजूला राहतो.

चाैधरी अजनी चाैकातील भवानी चेंबरमध्ये अनेक दिवसांपासून ‘रेडिफाइन द प्रोफेशनल फॅमिली सलून’ चालवित होता. येथे येणाऱ्या आंबटशाैकीन ग्राहकांना तरुणींकडून मसाज देऊन त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे, शहरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या अनेक महिला-मुलींना तो आपल्या सलूनमध्ये जागा उपलब्ध करून देत होता. ही माहिती कळाल्यानंतर, गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसबीच्या पोलीस निरीक्षक कविता ईसारकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सापळा लावला.

आरोपी रवि चाैधरीकडे शनिवारी दुपारी बनावट ग्राहक पाठवून त्याला वारांगणाबाबत विचारणा करण्यात आली. त्याने ३ हजारांत वारांगणा उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली. ग्राहकाकडून रक्कम घेतल्यानंतर दोन वारांगणा त्याला दाखविण्यात आल्या. त्याच वेळी पोलिसांनी तेथे छापा घातला. आरोपी रवि चाैधरी, तसेच त्या वारांगणांना ताब्यात घेण्यात आले. चाैकशीनंतर वारांगणांना सोडून देण्यात आले, तर चाैधरीविरुद्ध अजनी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वारांगणेला पाचशे रुपये

आरोपी चाैधरी त्याच्याकडे असलेल्या वारांगणेला एका ग्राहकाचे केवळ पाचशे रुपये देत होता. तीन-चार ग्राहक, अर्थात दिवसभरात दोन हजारांपर्यंत रक्कम हाती पडत असल्याने चाैधरीच्या संपर्कात अनेक वारांगणा असायच्या. शनिवारी त्याच्या सलूनमध्ये पोलिसांनी छापा घातल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन वारांगणांपैकी एक परितक्त्या आहे, तर दुसरी घरच्यांना अंधारात ठेवून हा व्यवसाय करीत असल्याचे पुढे आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीProstitutionवेश्याव्यवसायSex Racketसेक्स रॅकेट