शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
2
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
3
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
4
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
5
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
6
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
7
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
8
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
9
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
10
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
11
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
12
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
13
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
14
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
15
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
16
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
17
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
18
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
19
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
20
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण मंत्रालय, पुणे फॉरेन्सिकसह अनेक पथके भंडाऱ्यात

By नरेश डोंगरे | Updated: January 28, 2025 20:58 IST

स्फोट झालाच कसा, गंभीर दखल : वेगवेगळ्या यंत्रणांकडून वेगवेगळी चाैकशी

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माणीत शुक्रवारी २४ जानेवारीला झालेला भीषण स्फोटाची राज्य सरकारसोबतच संरक्षण मंत्रालयाकडूनही गंभीर दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्ससह वेगवेगळी पथके भंडाऱ्याच्या आयुध निर्माणीत धडकली आहेत. हे अधिकारी 'स्फोट झालाच कसा' त्याची चाैकशी करीत आहे. दुसरीकडे पुण्या-मुंबईतील फॉरेन्सिकचे पथकही या भयावह स्फोटाची चाैकशी करीत आहे.

राज्याच्या एका टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माणीत २४ जानेवारीच्या सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात आठ तरुणांचे बळी गेले तर पाच जण अजूनही मृत्यूशी झूंज देत आहेत. यापुर्वी अशाच प्रकारे पुलगावच्या (जि. वर्धा) दारूगोळा भंडारातही स्फोटाची अशीच भीषण घटना घडली होती. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने आयुध निर्माणीत सुरक्षेच्या उपाययोजनांची (एसओपी) कडक अंमलबजावणी करण्यासंबंधीचे आदेश जारी केले. आयुध निर्माणीत काम सुरू होण्यापासून तो बंद होण्यापर्यंत काय काळजी घ्यायची, कशा पद्धतीने काम करवून घ्यायचे, त्याबाबत कडक नियमावली दिली असताना भंडाऱ्यात ही घटना घडली. त्यामुळे त्याची संरक्षण मंत्रालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या तज्ज्ञांचे एक पथक या स्फोटाची चाैकशी करण्यासाठी भंडाऱ्यात पोहचले आहे. हा स्फोट झालाच कसा, स्फोटाची कारणे कोणती आणि त्याला कोण जबाबदार, त्याची या पथकाकडून कसून चाैकशी केली जात आहे.

पुणे, मुंबईचीही पथके दाखल

संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या आणि पुण्यात मुख्यालय असलेल्या म्यूनिशंस इंडिया लिमिटेड (एमआयएल)च्या शिर्षस्थ अधिकाऱ्यांचे एक पथक दोन दिवसांपूर्वीच भंडारा येथे दखल झाले आहे. गोळा बारूद, बॉम्ब आणि स्फोटकांच्या तज्ज्ञांचा यात समावेश आहे.

एसओपीचे पालन का झाले नाही ?

येथे एवढा भीषण स्फोट झाला, म्हणजेच नेमून दिलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांचे (एसओपी) पालन झाले नाही. त्यासाठी नेमके कोण कोण कारणीभूत आहे, ते तपासण्यासाठी स्फोटके आणि फायरशी संबंधित स्टेट सेफ्टी ऑफिसरच्या नेतृत्वातील एक पथक मुंबईहून येथे दाखल झाले आहे.

एसआयटीची स्वतंत्र चाैकशी

शिर्षस्थ अधिकारी आणि संबंधितांची पथके एकीकडे स्फोटाची कारणे आणि तीव्रता शोधत असतानाच या घटनेला कोण कारणीभूत आहेत, त्याचा तपास भंडारा पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) करीत आहे.

संरक्षण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या दिल्ली, मुंबई, पुण्यातील वेगवेगळी पथके शिर्षस्थ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात चाैकशी करीत आहे. या संबंधाने त्यांची नावे सांगणे योग्य होणार नाही. जखमींना चांगले उपचार देऊन त्यांचे जीव वाचविण्यावर भर दिला जात आहे.-रमेशकुमार यादव जनसंपर्क अधिकारी, आयुध निर्माणी, भंडारा.

 

टॅग्स :bhandara-acभंडारा