शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महापालिका कर्मचारी व शिक्षकांसाठी सातवा वेतन आयोग लांबणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 22:15 IST

राज्य शासनाने अद्याप मंजुरी दिली नसल्याने महापालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग लांबणीवर पडला आहे. प्रशासनाच्या परिपत्रकामुळे कर्मचारी व शिक्षकांत खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमनपा अतिरिक्त आयुक्तांचे परिपत्रक : शासन मंजुरीनंतरच मिळणार वाढीव वेतन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका कर्मचारी व शिक्षकांना सातवा वेतन आयोग १ऑगस्ट २०१९ पासून (पेड इन सप्टेंबर) लागू करण्याचा निर्णय सभागृहात घेण्यात आला होता. स्थायी समितीने प्रस्तावित अर्थसंकल्पात यासाठी आर्थिक तरतूद केली होती. ऑगस्टपासून वेतन आयोग लागू होईल. सप्टेंबर २०१९ चे वेतन वाढीव स्वरुपात असेल, अशी घोषणा सत्तापक्षाने सभागृहात केली होती. परंतु राज्य शासनाने अद्याप मंजुरी दिली नसल्याने कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग लांबणीवर पडला आहे. प्रशासनाच्या परिपत्रकामुळे कर्मचारी व शिक्षकांत खळबळ उडाली आहे.सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या निर्णयाची घोषणा होताच कर्मचारी उत्साहात होते. थकबाकी मिळणार नसली तरी ऑगस्ट महिन्यापासून वाढीव वेतन मिळणार होते. विभागप्रमुख व वित्त विभागाने याची तयारी केली होती. मात्र बुधवारी अपर आयुक्तांनी परिपत्रक काढून कर्मचारी व शिक्षकांना ऑगस्ट महिन्याचे वेतन सहाव्या वेतन आयोगानुसार देण्याचे निर्देश विभागप्रमुखांना दिले आहे.२६ जुलै २०१९ रोजी मनपा प्रशासनाने परिपत्रक काढून कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार देण्याचे निर्देश विभागप्रमुखांना दिले होते. त्यानंतर महापालिका सभागृहात सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याचे निर्देश आयुक्तांना दिले होते.दरम्यान, २ ऑगस्ट २०१९ रोजी शासनाने आदेश निर्गमित करून आर्थिक स्थितीचा विचार करून वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर ८ ऑगस्टला महापालिका प्रशासनाने वेतन आयोग लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. परंतु शासनाकडून अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने ऑगस्ट महिन्याचे वेतन सहाव्या वेतन आयोगानुसार देण्याबाबतचे परिपत्रक अपर आयुक्त अझीझ शेख यांनी काढले आहे.विशेष म्हणजे, २५ ऑक्टोबर २०१० पासून मनपा कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू झाला. १ जानेवारी २००६ ते ३० नोव्हेंबर २०१० या दरम्यानचे १२० कोटींचे अरिअर्स थकीत आहे, ते द्यावयाचे झाल्यास महापालिकेवर आर्थिक बोजा वाढणार असल्याने न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सातव्या वेतन आयोगामुळे ११० कोटींचा बोजा वाढणार असल्याने शासनाकडून मंजुरी मिळेल की  नाही, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारी