शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

पोषण ट्रॅकर अ‍ॅपच्या वापरला सतराशे विघ्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 13:18 IST

Nagpur News स्तनदा माता, गरोदर महिला, मुलांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी पोषण ट्रॅकर नावाच्या अ‍ॅपमध्ये १० प्रकारची माहिती सेविकांना भरावी लागते. ही सर्व माहिती इंग्रजीत भरावी लागत असल्याने सेविकांची अडचण होत आहे.

ठळक मुद्दे दिलेल्या मोबाइलवर अ‍ॅप ऑपरेटही होत नाहीइंग्रजी येत नसेल तर अंगणवाडीसेविका कशी भरणार माहिती?

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्तनदा माता, गरोदर महिला, मुलांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी शासनातर्फे अंगणवाडीसेविकांना मोबाइल देण्यात आले. त्या मोबाइलमध्ये पोषण ट्रॅकर नावाच्या अ‍ॅपमध्ये १० प्रकारची माहिती सेविकांना भरावी लागते. ही सर्व माहिती इंग्रजीत भरावी लागत असल्याने सेविकांची अडचण होत आहे. या अ‍ॅपला मानधनाशी जोडले जात असल्याने त्यांच्यापुढे संकट निर्माण झाले आहे.

अंगणवाड्यांच्या कामकाजाची माहिती शासनाला दैनंदिन पातळीवर कळविण्यासाठी, मे २०२० पर्यंत कॅस अ‍ॅप्समध्ये भरली जात होती. परंतु, मे २०२० पासून कॅसमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे ते बंद पडले व माहिती पुन्हा रजिस्टरमध्ये भरण्याचे आदेश आले. त्यानंतर काहीच दिवसांत पोषण ट्रॅकर या केंद्र शासनाच्या नवीन अ‍ॅपवर काम करण्याचा आदेश आला.

- अंगणवाडी सेविकांना करावी लागणारी कामे

गरोदर महिलांची नोंदणी, स्तनदा माता नोंदणी, ० ते ३ व ३ ते ६ मुलांची नोंदणी, किशोरवयीन मुली, मुलांची नोंदणी, अंगणवाडी सुरू करणे मुलांची उपस्थिती, लसीकरण, वजन घेणे, पोलिओ ड्रॉप, सॅम-मॅमची माहिती, टीएचआरवाटप, पोषण आहारवाटप

- मोबाइलची अडचण

महाराष्ट्रात सर्व शासकीय व्यवहार मराठीत व्हावेत, असा आदेश आहे. त्यानुसार पोषण ट्रॅकरमध्येदेखील सर्व माहिती मराठीत भरली गेली पाहिजे. परंतु, पोषण ट्रॅकर अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध होत नाही. इंग्रजीमध्येच सर्व माहिती भरावी लागते. बहुसंख्य अंगणवाडी कर्मचारी, विशेषत: ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील सेविका, मिनी अंगणवाडीसेविका कमी शिकलेल्या आहेत व त्यांना इंग्रजीमध्ये माहिती भरता येत नाही. अनेक सेविकांचा शासनाने दिलेला मोबाइल नादुरुस्त आहे. त्यात पोषण ट्रॅकर अ‍ॅप डाउनलोड होत नाही. त्यामुळे त्यांना आपल्या खाजगी मोबाइलवर अ‍ॅप डाउनलोड करायला सांगितले जात आहे. अनेक जणींकडे स्वत:चा चांगला स्मार्ट फोन नाही. काहींकडे असल्यास तो त्या एकट्या वापरत नाहीत. अनेकांच्या पाल्यांचे त्यावर ऑनलाइन वर्ग किंवा परीक्षा चालू असतात. त्यामुळे त्यांना तो हवा तेव्हा उपलब्ध होईलच, याची खात्री देता येत नाही. शिवाय, डेटा रिचार्जचे पैसे महिनोनमहिने येत नाहीत. दुर्गम भागात इंटरनेटच्या अडचणी आहे.

- लाभार्थी बालकांचा आधारकार्ड क्रमांक जोडल्याशिवाय व सर्व माहिती इंग्रजीत भरल्याशिवाय त्यांना पूरक पोषण आहाराचा लाभ मिळू शकणार नाही, अशी जाचक अट पोषण ट्रॅकरमध्ये घालण्यात आलेली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन पोषण ट्रॅकरला जोडण्यात येणार आहे. अनेकदा प्रयत्न करूनही अ‍ॅपमध्ये भरलेली माहिती सिंक होत नाही. कधी रेंज न मिळाल्याने इंटरनेट चालू नसते किंवा त्याची क्षमता कमी असते, त्यामुळे माहिती अपलोड होत नाही, तर कधी सर्व्हर डाउन असतो.

चंदा मेंढे, सचिव, अंगणवाडी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र (सीटू)

- पोषण ट्रॅकर अ‍ॅपच्या अनेक अडचणी आहे. आता तो मानधनाशी संलग्न करण्यात येणार आहे. त्याचा परिणाम सेविकांच्या मानधनावर होणार आहे. अनेक सेविका अल्पशिक्षित आहे. अनेकांचे वय झाले आहे. मोबाइल बिघडलेले आहे. अशा अनेक अडचणी आहेत. आम्ही सध्या काम करणे बंद केले आहे. लवकरच आम्ही आंदोलन करणार आहोत.

ज्योती अंडरसहारे, आयटक

- ७५ टक्के अंगणवाडीसेविकांनी कामे केली आहे. २५ टक्के अंगणवाडीसेविकांचा प्रश्न आहे. त्यांनीही प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. हा निर्णय शासनस्तरावरून झाला आहे. शासनाने तयार केलेले अ‍ॅप आहे. त्यानुसार, कामकाज करायचे आहे.

भागवत तांबे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जि.प.

टॅग्स :Governmentसरकार