शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील इमामवाड्यातील सात वर्षीय मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 19:59 IST

इमामवाड्यात एका नराधमाने सात वर्षीय चिमुकलीवर तर मानकापुरात एका फेसबुक फ्रेण्डने १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला.

ठळक मुद्देमानकापुरात फेसबुक फ्रेण्डने केला बलात्कार : दोन्ही प्रकरणात पोक्सोनुसार गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इमामवाड्यात एका नराधमाने सात वर्षीय चिमुकलीवर तर मानकापुरात एका फेसबुक फ्रेण्डने १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला.इमामवाड्यातील आरोपीचे नाव रामदास पुनवू सेंदरे (वय ५५) असे आहे. वस्तीत राहणाऱ्या एका सात वर्षांच्या मुलीला त्याने बुधवारी सकाळी ११ वाजता पैशाचे आमिष दाखवून आपल्या घरात नेले आणि तेथे तिच्यावर पाशवी बलात्कार केला. घरी येऊन मुलीने आपल्या पालकांना माहिती दिली. ती शेजाऱ्यांना कळताच परिसरात संताप निर्माण झाला. अनेकांनी आरोपीकडे धाव घेतली. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.मानकापुरातील आरोपी केवळ १७ वर्षांचा आहे. त्याची फेसबुकवरून एका १६ वर्षीय मुलीसोबत २०१७ मध्ये ओळख झाली. ती मैत्री आणि प्रेमात रूपांतरीत झाली. उन्हाळ्याच्या सुटीत १ मे ते ५ मे २०१७ दरम्यान आरोपी मित्राने तिच्या घरी जाऊन ती एकटी असल्याची संधी साधून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणाला आता दोन वर्षे झाली. दरम्यानच्या कालावधीत ती मुंबईला राहायला गेली. तिकडे ती काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली. मुंबईतील कामोठे पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. तिला पोलिसांनी शोधून काढल्यानंतर चौकशी केली असता तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी तिला विचारपूस केली. दोन वर्षांपूर्वी नागपुरातील मित्राने बलात्कार केल्याचे तिने मुंबई पोलिसांना सांगितले. त्यामुळे कामोठे पोलिसांनी हे प्रकरण मानकापूर पोलिसांकडे पाठविले. पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारnagpurनागपूर