शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ड्रॅगन पॅलेस परिसरात साकारणार 'सेव्हन वंडर्स ऑफ बुद्धिस्ट वर्ल्ड'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 23:16 IST

कामठी येथील जगविख्यात ‘ड्रॅगन पॅलेस’ टेम्पल परिसरात आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट थीम पार्क साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला सेव्हन वंडर्स ऑफ बुद्धिस्ट वर्ल्ड असे संबोधण्यात येईल, अशी माहिती ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख आणि केंद्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सदस्य अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देमंगळवारी धम्मदीक्षा महोत्सव : केंद्रीय राज्यमंत्री रिजीजू प्रमुख अतिथी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठी येथील जगविख्यात ‘ड्रॅगन पॅलेस’ टेम्पल परिसरात आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट थीम पार्क साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला सेव्हन वंडर्स ऑफ बुद्धिस्ट वर्ल्ड असे संबोधण्यात येईल, अशी माहिती ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख आणि केंद्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सदस्य अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.त्यांनी सांगितले की, संपूर्ण जगाने तथागत गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान स्वीकारले. यात जपान, चीन, श्रीलंका, म्यानमार थायलंड, इंडोनेशिया यासह अनेक महत्त्वांच्या देशांचा समावेश आहे. या देशातील भाषा, संस्कृती भिन्न असल्यामुळे त्यांच्यात शैक्षणिक संस्कृती, शिक्षण व कला यांचे हे एक संयुक्त प्र्रकल्प म्हणून हा प्रकल्प उभारला जात अहे. ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येत्या मंगळवारी धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यंदा केंद्रीय राज्यमंत्री किरण रिजीजू हे प्रमुख अतिथी राहतील. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या महोत्सवात या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट थीम पार्क, माहिती पुस्तकाचे प्रकाशन व वेबसाईटचे उद्घाटन करण्यात येईल. पत्रकार परिषदेला नगरसेविका वंदना भगत, नंदा गोडघाटे उपस्थित होत्या.विशेष बुद्धवंदनाड्रॅगन पॅलेस टेम्पलमध्ये मंगळवारी सकाळी ९ वाजता भिख्खू संघ आणि डॅगन पॅलेसच्या संस्थापक अ‍ॅड. सुलेखा कुंभारे विशेष बुद्धवंदना ग्रहण करतील. यानंतर विपश्यना मेडिटेशन सेंटर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र परिसरात भंतेंना चिवरदान तसेच भोजनाचा कार्यक्रम होईल.

टॅग्स :Dragon Palace Templeड्रॅगन पॅलेस मंदिरnagpurनागपूर