शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग; शेतकरी-शेतमजुरांचं का बरं मरण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 23:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ८० टक्के लोक भारतात तर २० टक्के लोक इंडियात राहत आहेत. इंडियाचा सुपर इंडिया ...

ठळक मुद्देभारत विरुद्ध इंडिया चर्चासत्रात मान्यवरांचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ८० टक्के लोक भारतात तर २० टक्के लोक इंडियात राहत आहेत. इंडियाचा सुपर इंडिया होत आहे तर भारताचा इथिओपिया, सोमालिया होत आहे. भारताच्या या अवस्थेला व्यवस्थाच जबाबदार आहे. सरकार सातवा वेतन आयोग लागू करताना ८० टक्के भारताचा विचार का करीत नाही. सरकारच्या अशा धोरणामुळे ‘सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अन् शेतकरी-शेतमजुरांचं का बरं मरण’अशी म्हणण्याची वेळ आली आहे. वेतन आयोगाच्या तुलनेत शेतमजुरांची मजुरी वाढली नाही तर सबका साथ सबका विकास कसा होईल, असा सूर १६ व्या जागतिक मराठी संमेलनात आयोजित ‘भारत विरुद्ध इंडिया’ या चर्चासत्रात मान्यवरांनी आळवला.भारत म्हणजे गाव व इंडिया म्हणजे शहर या दोन्हीच्या अवस्था आणि व्यवस्थेवर या चर्चासत्राचे आयोजन केले होते. चर्चासत्रात शेतकरी नेते विजय जावंधिया, प्रा. शरद पाटील, ललित बहाळे, डॉ. गिरीश गांधी, कवी तुकाराम धांडे, भरत दौंडकर सहभागी झाले होते. या चर्चासत्रात संवादक म्हणून कवी रामदास फुटाणे व रमेश बोरकुटे म्हणून सहभागी झाले होते. चर्चासत्राच्या प्रस्तावनेतच फुटाणे म्हणाले की, इंडियाच्या विकासासाठी स्मार्ट सिटी, मेट्रो ट्रेन, बुलेट ट्रेन कोट्यवधीचे बजेट उपलब्ध होत आहे, तर भारतात ५० हजारासाठी शेतकरी आत्महत्या करतो आहे. शहर आणि ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्थेत ही दुफळी का? असा सवाल त्यांनी जावंधिया यांना केला. यावर उत्तर देताना जावंधिया म्हणाले की, गोऱ्या इंग्रजापासून स्वीकारलेली ही व्यवस्था आहे. त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवून, शेतकऱ्यांवर नाना तऱ्हेचे कर लावले होते. असेच काहीसे आजही इंडिया भारतात होत आहे. ही चर्चा पुढे स्वामीनाथन आयोगावर आली. यावेळी प्रा. शरद पाटील म्हणाले की, हरित क्रांती ही डॉ. स्वामीनाथन यांच्यामुळे झाली. त्यावेळी ५० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात भूकबळी होतात. त्यावेळी अन्न हे आंतरराष्ट्रीय व्यवहारात प्रभावी शस्त्र होते. हरित क्रांतीमुळे शेतीचे उत्पादन वाढले. त्यावेळी हरित क्रांतीची गरज होती, असे पाटील म्हणाले. कारखानदारी टिकविण्यासाठी शेतकऱ्यांशी तडजोडचर्चासत्रात ललित बिहाळे म्हणाले की, कारखानदारी टिकविण्यासाठी सरकारची धोरणे शेतकऱ्यांप्रती कमकुवत ठरत आलेली आहे. दुसऱ्या महायुद्धात काही देश जिंकल्यानंतरही त्यांची हरल्यासारखीच अवस्था झाली होती. तशी भारताची झाली आहे.यापुढे कुठलाही वेतन आयोग सरकारने आणू नयेभारत आणि इंडियाच्या अवस्थेवर समर्पक उत्तर देताना डॉ. गिरीश गांधी म्हणाले की, देशातील सर्व घटकांना सरकार समानतेचे वेतन देऊ शकत नसेल तर सरकारने पुढचा वेतन आयोग आणूच नये. त्याचबरोबर फुकट अन्नधान्य वाटतानाही बेरोजगाराची फौज वाढवू नये. भारताच्या अवस्थेवरा हृदयद्रावक कविताया चर्चासत्रात ग्रामीण भागातील दोन कवींना सहभागी केले होते. तुकाराम धांडे, भरत दौंडकर या कवींनी भारताच्या अवस्थेवर मार्मिक कविता करून सर्वांना शेतकऱ्यांच्या अवस्थेचे भान करून दिले.

टॅग्स :marathiमराठीIndiaभारत