शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

बार्टीचे सात विद्यार्थी केंद्राच्या असिस्टंट कमांडंट पदी

By आनंद डेकाटे | Updated: June 18, 2025 17:39 IST

Nagpur : भुवनेश कांबळे, श्रेयस बसर्गे, निखील वसईकर, हिमांशू मून, अनिकेत ठमके, श्रीनाथ सातपुते, रोहित मोगले यांचा समावेश

आनंद डेकाटेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीतर्फे घेण्यात येत असलेल्या युपीएससी नागरी सेवा पूर्व तथा मुख्य परीक्षेचे पूर्वतयारी प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व चाचणी आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल २०२४ साठी बार्टीच्या सात विद्यार्थ्यांची असिस्टंट कमांडंट पदी निवड करण्यात आली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत त्यांचे हैद्राबाद येथे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी प्रशिक्षण सुरु होणार आहे.

बार्टीच्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये भुवनेश कांबळे ( रॅंक १९४), श्रेयस बसर्गे (रॅंक २७५), निखील वसईकर (रॅंक ३२७), हिमांशू मून ( रॅंक ३६२), अनिकेत ठमके ( रॅंक ३९०), श्रीनाथ सातपुते (रॅंक) ४००, रोहित मोगले (रॅंक ४१२) या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत बार्टीमुळे असिस्टंट कमांडंट बनण्याचे स्वप्न साकार झाल्याचे मनोगत व्यक्त केले.

संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) भरतीसाठी (असिस्टंट कमांडंट) परीक्षा आयोजित करते. सीएपीएफ हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय पोलीस संघटनांचे सामूहिक नाव आहे. या दलांमध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी) यांचा समावेश होतो. या दलांची भूमिका प्रामुख्याने अंतर्गत धोक्यांपासून राष्ट्रीय हिताचे रक्षण करणे आहे.

युपीएससीद्वारा आयोजित केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षेमार्फत सीएपीएफ मध्ये अधिकाऱ्यांची भरती केली जाते. बार्टी मार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी यु.पी.एस.सी.-नागरी सेवा पूर्व तथा मुख्य परीक्षेचे पूर्वतयारी प्रशिक्षण योजने अंतर्गत पुर्व तसेच मुख्य परीक्षेचे प्रशिक्षणासह व्यक्तिमत्त्व चाचणी प्रशिक्षण दिल्या जाते. प्रशिक्षण योजनेत विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मासिक विद्यावेतन, मोफत प्रशिक्षण, प्रवास भत्ता दिल्या जातो. 

टॅग्स :nagpurनागपूर