शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

नागपूर परिमंडळात विजेच्या मागणीत सात टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:40 IST

वीज वितरण हानी एक टक्क्याहून कमी करीत महावितरणच्या नागपूर परिमंडळात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ या आर्थिक वर्षात तब्बल ७ टक्के विजेची मागणी वाढली आहे. विजेच्या वाढत्या मागणीसोबच ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा देण्यासाठी महावितरणकडून सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत.

ठळक मुद्देवितरण हानी एक टक्क्याहून कमी : ८० हजारावर थकबाकीदारांचा पुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज वितरण हानी एक टक्क्याहून कमी करीत महावितरणच्या नागपूर परिमंडळात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ या आर्थिक वर्षात तब्बल ७ टक्के विजेची मागणी वाढली आहे. विजेच्या वाढत्या मागणीसोबच ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा देण्यासाठी महावितरणकडून सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत.मागील वर्षी नागपूर परिमंडलात येणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात ४,६१३.५५ दशलक्ष युनिट विजेचा वापर झाला होता. पण नुकत्याच संपलेल्या २०१७-१८ या आर्थिक वर्षातील फेब्रुवारीपर्यंत ४९३८. ८५ दशलक्ष युनिट विजेचा वापर परिमंडळातील वीज ग्राहकांनी केला आहे. घरगुती वीज ग्राहकांचा वीज वापर या काळात वाढल्याचे निदर्शनास आले आहे. मागील वर्षी १२३८.१८ दशलक्ष युनिट विजेचा वापर घरगुती आणि व्यावसायिक वीज ग्राहकांनी केला तर २०१७-१८ या आर्थिक वर्षात१४७७.३६ दशलक्ष युनिट विजेचा वापर घरगुती आणि व्यावसायिक वीज ग्राहकांनी केला आहे. यात नागपूर ग्रामीणमध्ये सर्वाधिक वीज वापर झाल्याचे निदर्शनास आले आहे. नागपूर ग्रामीणमध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षात ५५८. ५९ दशलक्ष युनिट,नागपूर शहर मंडलात ५२९. ७२ दशलक्ष युनिट तर वर्धा मंडलात ३८९. ०५ दशलक्ष युनिटचा वापर झाला आहे. या मंडलात ही वाढ अनुक्रमे २. १७ टक्के , २.७० टक्के आणि ३.५६ टक्के झाली आहे. वर्धा जिल्ह्यात टक्केवारीच्या हिशेबात वाढ झाली आहे. एकूण वीज वापराचा हिशेब बघितला तर नागपूर ग्रामीण मंडळात मागील आर्थिक वर्षात २१५१.५८ दशलक्ष युनिट विजेचा वापर झाला तर शहरात १४९७.९५ दशलक्ष युनिटचा वापर झाला आहे. वर्धा जिल्ह्यात १२८९.३२ दशलक्ष युनिटचा वापर झाला आहे.वीज ग्राहकांना आर्थिक शिस्त लागावी म्हणून महावितरणकडून नोव्हेंबर-२०१७ पासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करून पुनर्जोडणी शुल्क भरून वीज पुरवठा नियमित करणे असे याचे स्वरूप होते. २०१७-१८ या आर्थिक वर्षात ८०,५३२ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करून पुनर्जोडणी शुल्कापोटी ५६ लाख रुपये गोळा करण्यात आले.वितरण हानी कमीलघुदाब आणि उच्चदाब वितरण हानीचे प्रमाणही ऊजामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनामुळे कमी करण्यात महावितरणच्या स्थानिक अधिकारी वगार्ला यश आले आहे. १६-१७ या आर्थिक वर्षात नागपूर परिमंडळात वितरण हानीचे प्रमाण ७.८२ टक्के होते ते २०१७-१८ मध्ये फेब्रुवारीअखेर ६.९९ टक्क्यापर्यंत खाली आले होते. मार्चअखेरची आकडेवारी एकत्रित केल्यास वितरण हानीचा आकडा आणखी खाली येऊ शकतो. रफिक शेख, मुख्य अभियंता, नागपूर परिमंडळ११ हजारावर मीटर बदलले वीज ग्राहकांकडून नादुरुस्त वीज मीटर संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. याची दाखल घेत मार्च-२०१८ अखेरपर्यंत १०,५६५ नादुरुस्त, खराब वीज मीटर बदलण्यात आले असून एप्रिल-२०१८ मध्ये ५३२ वीज मीटर बदलण्यात आले आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर