शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
6
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
8
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
9
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
10
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
11
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
12
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
13
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
14
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
15
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
16
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
17
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
18
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यात उंचावला मेडिकलच्या प्रगतीचा आलेख

By admin | Updated: April 24, 2015 02:19 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अव्यवस्था व दुरवस्था याबाबत नेहमी चर्चा होत असते.

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अव्यवस्था व दुरवस्था याबाबत नेहमी चर्चा होत असते. परंतु याच अपुऱ्या संसाधनाच्या बळावर प्रभारी असतानाही डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी सात महिन्यात जे करून दाखविले ते अनेकांना तीन-चार वर्षातही जमले नाही. विशेषत: स्वच्छता, रुग्णसेवा, व कामकाजात शिस्त आणून त्यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला. त्यांच्या या कामाच्या पावती म्हणूनच शासनाने त्यांना पदोन्नती देत मेडिकलच्या अधिष्ठातापदाची जबाबदारी सोपविल्याचे बोलले जात आहे. तसा फॅक्स गुरुवारी मेडिकलला प्राप्त झाला आहे.शासनाच्या उदासीनतेचा फटका राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांना बसत आहे. आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढणे अनेकांना कठीण जात आहे. गेल्या दहा वर्षांपासून चतुर्थ कर्मचाऱ्यांची पदेच भरण्यात आली नसल्याने विशेषत: नागपूरच्या मेडिकलची सफाई व्यवस्था पूर्णत: कोलमडली होती. सप्टेंबर महिन्यात प्रभारी अधिष्ठाताची जबाबदारी डॉ. निसवाडे यांच्याकडे येताच त्यांनी स्वच्छतेला प्राधान्य दिले. परिणामी, रुग्णालयातील वॉर्डासह वऱ्हांडाही चकाचक झाला आहे. सफाईची समस्या मार्गी लागताच कामकाजात शिस्त आणण्यासाठी डॉक्टरांनी पांढरा कोट (अ‍ॅप्रॉन) घातलच पाहिजे, अशी सक्ती करीत अंमलबजावणी केली. जास्तीत जास्त रुग्णांना उपचार मिळावा, बाहेर गावावरून येणाऱ्या रुग्णांची सेवा घडावी यासाठी बाह्यरु ग्ण विभागाची (ओपीडी) वेळ एक तासाने वाढविण्याचा धाडसी निर्णयही घेतला. जखमी रुग्णांना तत्काळ उपचार मिळावायासाठी जुने अपघात विभागाला पुन्हा कार्यन्वित केले. दोन आकस्मिक विभाग असलेले राज्यात नागपूर मेडिकल पहिले आहे. वरिष्ठ डॉक्टरांची २४ तास सेवा कशी मिळेल याकडे ते आता लक्ष देऊन आहेत. महत्त्वाचे म्हणजे, राज्यात प्रथमच शासकीय रुग्णालयात ‘किडनी ट्रान्सप्लांट’ सुरू करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ही सेवा कार्यान्वित होत आहे. सात महिन्यांच्या कारकिर्दीत त्यांनी मेडिकलचे रूप पालटले आहे. म्हणूनच की काय त्यांच्याकडे कायमस्वरूपी अधिष्ठाता पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ. निसवाडे म्हणाले, सहकाऱ्यांच्या विश्वासाच्या भरवशावर हे शक्य झाले आहे. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानूनच आतापर्यंत सेवा देत आलो आहे, पुढेही अशीच सेवा देण्याचा प्रयत्न राहणार आहे.(प्रतिनिधी)