लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानकापूर येथील एलेक्सिस रुग्णालयावर महापालिकेच्या पीसीपीएनडीटी समितीतर्फे बुधवारी कारवाई करण्यात आली. यात सोनोग्राफी, इको, वॅन फायडरसह एकूण सात मशीन्स जप्त करण्यात आली. यासोबतच अपात्र डॉक्टर तपासणी करीत असल्याचेही तपासात आढळून आले.गर्भधारणेपूर्वी व प्रसवपूर्वी करण्यात येणाऱ्या तपासण्यांच्या नियमांचे उल्लंघन रुग्णालयाकडून होत असल्याची तक्रार मिळाली होती. या आधारावर कारवाई करीत दस्तावेज जप्त करण्यात आले. दस्तावेजाच्या तपासणीनंतर पुढील कारवाई निश्चित करण्यात येईल.पीसीपीएनडीटी समितीच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. समितीच्या सदस्यांनी तक्रारकर्त्यासोबतच रुग्णालय व्यवस्थापनाशी चर्चा केली. समितीच्या सदस्यांना गंभीर त्रुटी आढळून आल्या. यानंतर सर्व सोनोग्राफी मशीन व रेकॉर्ड जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. मशीन्ससोबतच रेकॉर्ड बुकही जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान रुग्णालय व्यवस्थापनाने समितीच्या सदस्यांना पूर्ण मदत केली.
नागपुरातील एलेक्सिस रुग्णालयातील सात मशीन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 22:16 IST
मानकापूर येथील एलेक्सिस रुग्णालयावर महापालिकेच्या पीसीपीएनडीटी समितीतर्फे बुधवारी कारवाई करण्यात आली. यात सोनोग्राफी, इको, वॅन फायडरसह एकूण सात मशीन्स जप्त करण्यात आली.
नागपुरातील एलेक्सिस रुग्णालयातील सात मशीन जप्त
ठळक मुद्देपीसीपीएनडीटी समितीची कारवाई : अपात्र डॉक्टर करीत होते तपासणी