शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील सवई, भंडारी, गुल्हानेंसह राज्यातील सात डॉक्टर निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 22:14 IST

बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याने आरोग्य विभागाचा सात वरिष्ठ डॉक्टरांना गुरुवारी निलंबनाचे पत्र मिळाल्याने खळबळ उडाली. यात नागपूर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई, भंडारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश आर. भंडारी व प्रादेशिक मनोरुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन.एस. गुल्हाने यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देबदलीच्या ठिकाणी रुजू न होण्याचे कारण भोवले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याने आरोग्य विभागाचा सात वरिष्ठ डॉक्टरांना गुरुवारी निलंबनाचे पत्र मिळाल्याने खळबळ उडाली. यात नागपूर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई, भंडारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश आर. भंडारी व प्रादेशिक मनोरुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन.एस. गुल्हाने यांचा समावेश आहे.गेल्या काही वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या सात डॉक्टरांच्या बदल्यांचे आदेश मे व जून महिन्यात आरोग्य विभागाने जारी केले होते. यात नागपूर विभागातील डॉ. योगेंद्र सवई यांची बदली चंद्रपूर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी म्हणून करण्यात आली होती. डॉ. कमलेश भंडारी यांची बदली अकोला येथे समान पदावर, तर डॉ. नितीन गुल्हाने यांची बदली बधिरीकरणतज्ज्ञ म्हणून भंडारा जिल्हा रुग्णालयात झाली होती. आदेशात सात दिवसांच्या आत बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचा उल्लेख होता. परंतु रुजू होण्यास टाळाटाळ करीत त्याच ठिकाणी कायम राहिले. अखेर २६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नागरी सेवा नियम अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करीत शिस्तभंगाची कारवाई करीत शासनाने सातही डॉक्टरांवर तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश काढले. याचे पत्र गुरुवार २७ सप्टेंबर रोजी संबंधित डॉक्टरांच्या हाती पडताच चर्चेला पेव फुटले. विशेष म्हणजे पत्रात, बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याने निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचा उल्लेख नाही किंवा निलंबनाचे कोणतेही कारण देण्यात आले नाही. सुत्रानूसार, या अधिकाऱ्यांना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यमुक्त न केल्यामुळेच ते बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याचे सांगण्यात येते.शासनाच्या आदेशाचे पालन व्हायलाच हवेशासनाच्या आदेशानंतरही आणि वारंवार स्मरण करून देऊनही बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याने राज्यातील सात डॉक्टरांचे निलंबन करण्यात आले. शासनाच्या आदेशाचे पालन व्हायलाच हवे. कुणी अधिकारी स्वत:च्या सोयीने काम करीत असेल तर कारवाई नक्कीच होणार.डॉ. संजीव कांबळेसंचालक, आरोग्य सेवा

टॅग्स :doctorडॉक्टरsuspensionनिलंबन