शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

राष्ट्रीय महालोक अदालतीत २४ हजार प्रकरणांचा निपटारा

By admin | Updated: December 14, 2014 00:44 IST

नागपूर जिल्हा न्यायालयात शनिवारी पार पडलेल्या राष्ट्रीय महालोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ३१ हजार १३६ प्रकरणांपैकी २४ हजार ७१ प्रकरणे आपसी समझोत्याने निकाली निघाली.

नागपूर : नागपूर जिल्हा न्यायालयात शनिवारी पार पडलेल्या राष्ट्रीय महालोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ३१ हजार १३६ प्रकरणांपैकी २४ हजार ७१ प्रकरणे आपसी समझोत्याने निकाली निघाली. ही टक्केवारी ७६ एवढी असून प्रलंबित प्रकरणे ६ टक्क्यांनी कमी झाली आहेत. विशेष अभियान अंतर्गतची ८ हजार ६०१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. ही माहिती जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव किशोर जयस्वाल यांनी दिली. राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण, राज्य विधीसेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाने संयुक्तपणे या महालोक अदालतीचे आयोजन केले होते. प्रकरणे हाताळण्यासाठी ९४ पॅनल तयार करण्यात आले होते. त्यात एक न्यायाधीश, वकील, सामाजिक कार्यकर्ता आणि विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. आठ लाखांच्या दाव्याचे पहिलेच यशमहालोक अदालतीच्या कामकाजाला प्रारंभ होताच निवृत्त जिल्हा न्यायाधीश कुबडे यांच्या प्रयत्नाने मोटार अपघात दाव्याचे एक प्रकरण केवळ तासाभरातच निकाली निघाले. अर्जकर्त्या वत्सला भगवान ठवकर यांनी त्यांचा ८ लाखांचा दावा ५ लाख रुपयात संपविला. युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनीने लागलीच तडजोड रकमेचा धनादेश प्रमुख जिल्हा न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या मार्फत ठवकर यांच्या स्वाधीन केला. चाकूमारीचे प्रकरण१९८० अर्थात ३४ वर्षांपासून प्रलंबित असलेले चाकूमारीचे प्रकरण आपसी समझोत्याने निकाली निघाले. आरोपी कृष्णराव पौनीकर आणि उरकुडा भुजभुजे यांनी हुमदेव फटिंग यांच्यावर चाकू हल्ला करून जखमी केले होते. लकडगंज पोलीस ठाण्यात भादंविच्या ३२४ कलमान्वये गुन्हा दाखल होता. समझोता होऊन दोन्ही पक्ष स्मित हास्याने न्यायालयातून परत गेले. महिला आरोपीला दिलासावाडी भागातील विजया हिरणवार नावाच्या एका महिलेने सीताबाई डोंगरे हिला उसणे पैसे दिले होते. विजया आपले पैसे मागण्यासाठी सीताबाईकडे गेली असता तिने मारहाण केली होती. १२ मे १९९७ रोजी सीताबाईविरुद्ध वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. १७ वर्षांपासून या दोघीही न्यायालयाच्या चकरा मारून त्रस्त झाल्या होत्या. महालोक अदालतीत त्यांच्यात समझोता झाला. पावणेसात कोटींवर रक्कम जमाभूसंपादन, मोटार अपघात दावे, धनादेश अनादर प्रकरणे, प्रकरण दाखलपूर्व वसुली दावे यातून एकूण ६ कोटी ८६ लाख ४५ हजार ६३ रुपयांची रक्कम तडजोडीच्या स्वरूपात प्राप्त झाली. दंडापोटी ३३ लाख ४५ हजार ८५२ रुपयांची रक्कम जमा झाली. तीन कोटींवर रक्कम मोटार अपघात दाव्यांची तर दोन कोटींवर रक्कम धनादेश अनादर प्रकरणातील तडजोडीची होती. अन् संसार विस्कटला होताया महालोक अदालतीमध्ये विस्कटलेल्या एका नवदाम्पत्याच्या संसाराला नवी दिशा मिळाली. २५ मे २०१३ रोजी थाटात विवाह समारंभ पार पडून दुसऱ्या दिवशीच पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्यामुळे दोघेही विलग झाले होते. दोघांचे प्रकरण विधीसेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात आल्यानंतर ते मध्यस्थाकडे पाठविण्यात आले होते. अनेक बैठकानंंतर आज समझोता होऊन दोघेही नव्याने संसार करण्यास तयार झाले. ३१ वर्षांनंतर फसवणूक प्रकरण निकालीआंबेडकरनगर येथील ललिता गायकवाड नावाच्या एका महिलेने आरोपी दयानंद यादव याला सोनसाखळी पॉलिश करण्यासाठी दिली होती. पॉलिशनंतर वजन कमी झाल्याचे समजताच यादव आणि गायकवाड यांच्यात वाद झाला. नरेश गायकवाड यांच्या तक्रारीवरून १९ एप्रिल १९८३ रोजी सीताबर्डी पोलिसांनी यादवविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण महालोक अदालतीत तडजोडीने निकाली निघाले. पक्षकारच उत्कृष्ट न्यायाधीशलोकअदालत हे वाद निवारणाचे प्रभावी तंत्र आहे. पक्षकार हे स्वत:च त्यांचा वाद समजवून घेणारे उत्कृष्ट न्यायाधीश असतात. त्यांना वस्तुस्थितीची चांगली जाण असते, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा न्यायाधीश किशोर सोनवणे यांनी याप्रसंगी केले. (प्रतिनिधी)