शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

विदर्भातील १३,७३३ कोविड रुग्णांना दिली सेवा; १५१ रुग्णवाहिका रुग्णसेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 10:06 IST

'महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस'च्या 'डायल १०८’ रुग्णवाहिकेने या दोन महिन्यात विदर्भातील १३ हजार ७३३ कोरोनाबाधितांसह, त्यांच्या संपर्कातील व संशयित रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहचवून देण्याची व बरे झाल्यानंतर घरीही सोडण्याची सेवा दिली आहे.

ठळक मुद्दे१०८ रुग्णवाहिकेचे चालक, डॉक्टर्स ठरले योद्धे 

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड रुग्णांच्या सेवेत रुग्णवाहिकेची भूमिकाही महत्त्वाची ठरत आहे. विशेषत: 'महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस'च्या 'डायल १०८’ रुग्णवाहिकेने या दोन महिन्यात विदर्भातील १३ हजार ७३३ कोरोनाबाधितांसह, त्यांच्या संपर्कातील व संशयित रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहचवून देण्याची व बरे झाल्यानंतर घरीही सोडण्याची सेवा दिली आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांसोबतच या रुग्णवाहिकेतील डॉक्टर, चालक व व्यवस्थापकही ‘वॉरिअर्स’ ठरले आहेत. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि 'बीव्हीजी इंडिया लिमिटेड' या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणाºया ‘१०८ रुग्णवाहिका’ची संख्या राज्यात ९३७ आहे. यात २३३ ‘अ‍ॅडव्हान्सड् लाईफ सपोर्ट (एएलएस) तर ४०७ ‘बेसिक लाईफ सपेट अ‍ॅम्ब्युलन्स (बीएलएस) आहे. या सेवेच्या कार्यात ५००० हजारावर डॉक्टर्स, चालक व व्यवस्थापक काम करीत आहे. २६ जानेवारी २०१४ रोजी या सेवेचे लोकार्पण झाले. तेव्हापासून ते ३० एप्रिल २०२० पर्यंत ४८ लाख ३८ हजार १०२ रुग्णांना सेवा दिली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर १०८ रुग्णवाहिकेची मोठ्या प्रमाणात सेवा घेतली जात आहे. सुरूवातीला एकूण रुग्णवाहिकेच्या २५ टक्के रुग्णवाहिका यात समाविष्ट करण्याचा सूचना होत्या, परंतु नंतर रुग्णसंख्या वाढताच ७५ टक्क््यांपर्यंत रुग्णवाहिकेत वाढ करण्यात आली. सध्या विदर्भात १५१ रुग्णवाहिका कोविड रुग्णसेवेत आहेत. -नागपूर सर्कलमध्ये ६८३८ रुग्णांना दिली सेवानागपूर सर्कलमध्ये येणाऱ्या नागपूरसह भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व वर्धा या सहा जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या सेवेत ६९ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ११ मार्च ते २१ मे या दरम्यान १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने ६ हजार ८३८ रुग्णांसह, संशयित रुग्ण, संपर्कात आलेले लोकांना हॉस्पिटलमध्ये नेण्यास व आणण्यासही मदत करण्यात आली. नागपुरात २४००, भंडाºयात ९२९, चंद्रपूर १८१३, गडचिरोली ४६३, गोंदिया ७७० व वर्धेत ४६३ रुग्णांना मदत करण्यात आली.अकोला सर्कलमध्ये ६८९५ रुग्णांना मदत अकोला सर्कलमध्ये येणाऱ्या अकोल्यासह अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यासाठी ८२ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुग्णवाहिकेच्या मदतीने ६ हजार ८९५ रुग्ण व संशयितांना रुग्णालयापर्यंत पोहचविण्याची व बरे झालेल्यानंतर त्यांना घरी सोडण्यापर्यंतची सेवा देण्यात आली. अकोल्यात आतापर्यंत १,४९६, अमरावती २,१२८, बुलढाणा १,०१७, वाशिम ३३८ तर यवतमाळ येथे १,९१६ रुग्णांना मदत करण्यात आली.चालक व डॉक्टर प्रशिक्षण प्राप्तकोविड रुग्णांच्या सेवेत असलेल्या १०८ रुग्णवाहिकेतील चालक व डॉक्टरांना हे रुग्ण हाताळण्यासोबत पीपीई किट घालण्याचे व काढण्याचे प्रशिक्षण प्राप्त आहे. त्यांना सुरक्षेची साधने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात कार्यात सेवा देत असलेले सर्व चालक, डॉक्टर्स यांच्यासह जिल्हा व्यवस्थापक डॉ. बालाजी मंगम व विभागीय व्यवस्थापक डॉ. प्रशांत घाटे हे कोविड वॉरिअर्स ठरले आहेत. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस