शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नोकराची मालकासोबत बनवाबनवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:52 IST

ऑटोडीलच्या दुकानातील नोकराने त्याच्या मालकाकडून ग्राहकांना दाखवायला नेतो, असे सांगून तीन कार परस्पर विकून टाकल्या. एवढेच नव्हे तर दुसऱ्या एका कारमालकाकडून १ लाख, ६० हजार रुपये हडप केले.

ठळक मुद्देकार विकून रक्कम हडपली : बजाजनगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑटोडीलच्या दुकानातील नोकराने त्याच्या मालकाकडून ग्राहकांना दाखवायला नेतो, असे सांगून तीन कार परस्पर विकून टाकल्या. एवढेच नव्हे तर दुसऱ्या एका कारमालकाकडून १ लाख, ६० हजार रुपये हडप केले. सौरभ मुन्नालाल शर्मा (वय २६, रा. सलम अपार्टमेंट, हजारी पहाड) असे आरोपीचे नाव आहे.सुमितनगर जयताळा येथील वंदिश चंद्रकांत पंडित यांचे शंकरनगरात व्ही. व्ही. कार नावने दुकान आहे. तेथे सौरभ शर्मा काम करीत होता. १ जानेवारी २०१७ ला पंडित बाहेरगावी गेल्याची संधी साधून सौरभने त्यांची ३ लाख, ८० हजारांची कार नेली. त्याचप्रमाणे ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) येथील इकबाल जे. सहानी यांची साडेचार लाखांची शेवरलेट कार आणि अंधेरी मुंबई येथील क्षितिजकुमार गुप्ता यांची स्कोडा कार( किंमत साडेतीन लाख) ग्राहकांना दाखवून आणतो म्हणून नेली. या कारची रक्कम त्याने परस्पर हडपल्याचा आरोप आहे. त्यानंतर एक मारुती कार त्याने प्रदीप जामगडे यांना विकली. या कारच्या मालकाला १ लाख ६० हजारांचा धनादेश तर तेवढीच रक्कम रोख स्वरूपात जामगडे यांनी सौरभ शर्माच्या माध्यमातून दिली. मात्र, कारमालकाला रक्कम मिळालीच नाही त्यामुळे त्यांच्याकडून फायनन्स कंपनीने मारूती कार जप्त केली. आरोपीच्या या धोकेबाजीची तक्रार पंडित यांनी बजाजनगर पोलिसांकडे नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी सौरभ शर्माची चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीnagpurनागपूर