शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
3
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
4
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
5
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
6
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
7
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
8
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
9
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
12
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
13
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
14
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
15
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
16
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
17
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
18
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
19
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
20
'जुम्मा गर्ल' किमी काटकर आठवतेय का? लेटेस्ट फोटो आला समोर, ओळखणं झालंय कठीण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील संवेदनशील ‘कोचिंग क्लासेस’ होणार सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:31 IST

सूरत येथील ‘कोचिंग क्लासेस’मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेची गंभीर दखल घेऊन मनपाच्या अग्निशमन विभागाने आता आपले नियम अधिक कडक करण्याची तयारी सुरू केली आहे. वारंवार नोटीस दिल्यानंतरही ज्या कोचिंग क्लासेसवाल्यांनी आगीपासून संरक्षणाचे उपाय केलेले नाहीत, त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली जाईल. तसेच जीर्ण व धोकादायक इमारतींमध्ये असलेले कोचिंग क्लासेस अत्यंत संवेदनशील झाले आहेत, अशा क्लासेसला सील करण्यात येईल, असा निर्णय मनपा अग्निशमन विभागात आयोजित बैठकीत घेण्यात आला. मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनीसुद्धा अशा संबंधित शैक्षणिक संस्थांविरुद्ध कडक पाऊल उचलण्याचे समर्थन केले आहे. त्यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेण्याचे निर्देश जारी केले आहेत.

ठळक मुद्देवाणिज्यिक व बहुमजली इमारतींवर मनपाची विशेष नजर : मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सूरत येथील ‘कोचिंग क्लासेस’मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेची गंभीर दखल घेऊन मनपाच्या अग्निशमन विभागाने आता आपले नियम अधिक कडक करण्याची तयारी सुरू केली आहे. वारंवार नोटीस दिल्यानंतरही ज्या कोचिंग क्लासेसवाल्यांनी आगीपासून संरक्षणाचे उपाय केलेले नाहीत, त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली जाईल. तसेच जीर्ण व धोकादायक इमारतींमध्ये असलेले कोचिंग क्लासेस अत्यंत संवेदनशील झाले आहेत, अशा क्लासेसला सील करण्यात येईल, असा निर्णय मनपा अग्निशमन विभागात आयोजित बैठकीत घेण्यात आला. मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनीसुद्धा अशा संबंधित शैक्षणिक संस्थांविरुद्ध कडक पाऊल उचलण्याचे समर्थन केले आहे. त्यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेण्याचे निर्देश जारी केले आहेत.मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या उपस्थितीत सर्व स्टेशन अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यात कोचिंग क्लासेसविरुद्ध कडक पाऊल उचलणे आणि जारी करण्यात आलेल्या नोटीसची माहिती मागविण्यात आली. यात सुगतनगर येथील पाच, गंजीपेठ येथील चार, सक्करदरा येथील आठ आणि लकडंगज फायर स्टेशनअंतर्गत येणाऱ्या तीन कोचिंग सेंटरला नोटीस जारी करण्यात आलेली आहे. ज्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे, त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तर खासगी कोचिंग सेंटरची वस्तुस्थिती माहीत करून घेण्यासाठी सर्वे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले की, अनेक कोचिंग क्लासेसला फायर स्टेशनमार्फत अनेकदा नोटीस जारी करीत आगीपासून संरक्षणाचे उपाय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तरीही त्यांच्याकडून कुठलेही उत्तर येत नाही. अशा कोचिंग क्लासेसविरुद्ध फायर स्टेशनमार्फत पोलिसात तक्रार दाखल केली जाईल. तर ज्या इमारती जीर्ण किंवा धोकादायक झाल्या आहेत त्यांना थेट सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच संबंधित प्रकरणात कारवाई सुरू केली जाईल. शहरात ४०-४५ मोठे कोचिंग क्लासेस असे आहेत ज्यांना आगीपासून संरक्षणाचे उपाय करावेच लागतील.उपलब्ध करू शकले नाहीत डेटाबहुमजली व कमर्शियल इमारतींमध्ये मोठ्या कोचिंग क्लासेसची संख्या जवळपास ४० ते ४५ आहे. यातील बहुतांश पश्चिम नागपुरात येतात. परंतु पश्चिम नागपुरातील किती कोचिंग क्लासेसविरुद्ध कडक पाऊल उचलण्यात आले आहे, याची माहिती सिव्हील लाईन्स आणि नरेंद्रनगर फायर स्टेशनचे अधिकारी उपलब्ध करू शकले नाहीत. संबंधितांना मंगळवारपर्यंत माहिती उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले.यांच्याविरुद्ध होणार कारवाईजे कोचिंग क्लासेस १५० वर्गमीटरपेक्षा अधिकच्या क्षेत्रात आहेत, ते ज्या इमारतीमध्ये आहेत, त्याची उंची १५ मीटरपेक्षा अधिक असेल तर त्यांना अग्निशमन मानकांची पूर्तता करणे आवश्यक आहे. जे कोचिंग क्लासेस रहिवासी भागातील लहान परिसरात चालत आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अ‍ॅण्ड लाईफ सेफ्टी मेजर्स अ‍ॅक्ट २००६ लागू होत नाही.इलेक्ट्रिकल ऑडिटचा पर्याय उपलब्ध नाहीबहुतांश वेळा आग लागण्याचे कारण विजेच्या तारांचे जळणे आणि शॉर्टसर्किट असतात. जर इलेक्ट्रिकल ऑडिट केले आहे तर आगीच्या घटना नियंत्रणात आणता येऊ शकतात. अग्निशमन विभागाला जेव्हा विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितले की, अशाप्रकारच्या ऑडिटच्या आवश्यकतेचा पर्याय उपलब्ध नसल्याचे सांगितले. दुसरीकडे अवैध बांधकामामुळे आग मोठ्या प्रमाणावर पसरून अपघात होतात.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाOrder orderआदेश केणे