शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
3
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
4
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
5
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
6
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
7
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
8
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
9
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
10
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
11
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
12
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
13
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
14
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
15
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
16
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
17
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
18
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
19
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
20
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती

मंत्र्यांच्या वेगवेगळ्या घोषणांनी बाजारपेठांमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:11 IST

नागपूर : कोरोना रुग्ण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा करण्याचे अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असताना पालकमंत्र्यांसह अन्य मंत्री नागपूरसह ...

नागपूर : कोरोना रुग्ण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा करण्याचे अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असताना पालकमंत्र्यांसह अन्य मंत्री नागपूरसह राज्यात लॉकडाऊनचे संकेत देत आहेत. पालकमंत्री नितीन राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यात वेळेच्या निर्बंधांसह संभाव्य लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेनंतर विविध बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली असून, किरकोळ व्यापाऱ्यांनी ऑर्डर्स रद्द केल्या असून त्यामुळे होलसेल व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. व्यवसायाची प्रक्रिया थांबल्याचा आरोप नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आश्विन मेहाडिया यांनी बुधवारी पत्र परिषदेत केला.

रुग्ण वाढ नाही, मग बंधने कशाला?

मेहाडिया म्हणाले, मंत्र्यांनी व्यापारी संघटनांशी चर्चा करूनच घोषणा कराव्यात; पण सध्या नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीच्या घटना नसतानाही नितीन राऊत यांनी वेळेच्या निर्बंधाची संभाव्य घोषणा केली. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे. रुग्ण वाढले तर लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध नाही; पण अनावश्यक घोषणा करून मंत्री व्यापाऱ्यांना संकटात टाकत आहेत. व्यापाऱ्यांवर पूर्वीच कर्जाचा बोजा आहे आणि त्यातच या घोषणेने ते संकटात आले आहेत. गेल्यावेळी रुग्णसंख्या हजारावर गेल्यानंतर लॉकडाऊन लावले होते; पण आता रुग्णसंख्या दोन असताना वेळेचे निर्बंध का, असा सवाल मेहाडिया यांनी केला.

इन्स्पेक्टर राज येणार

बाजारपेठेत सर्वांचे दोन डोस झाले आहेत. दुकानदार मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेत आहेत. मंत्र्यांच्या निर्णयामुळे इन्स्पेक्टर राज येणार आहे. मनपाचे पथक केव्हाही येऊन दुकानदारांना दंड ठोठावणार आहे. अनेक नेते, अधिकारी व कर्मचारी मास्क घालत नाहीत. त्यांच्यावर दंड का ठोठावत नाही, असा सवाल मेहाडिया यांनी केला.

पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप, विदर्भाकडे कानाडोळा

नागपूर लेव्हल-१ मध्ये असतानाही राज्य सरकारने नागपूरला अडीच महिने वेळेच्या बंधनात ठेवले. तेव्हा पालकमंत्री काहीच बोलले नाहीत. या उलट पश्चिम महाराष्ट्रात सर्व दुकाने पूर्णवेळ सुरू होती. राज्यकर्ते विदर्भाकडे कानाडोळा करून अन्याय करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

-तर व्यापारी स्वत:च दुकाने बंद करतील

रूग्ण वाढू लागताच व्यापारी स्वत:च दुकाने बंद करतील. त्यावेळी वेळेचे निर्बंध लादल्यास व्यापारी विरोध करणार नाही; पण अनावश्यक निर्बंध लादल्यास व्यापारी विरोध करतील आणि आंदोलनाचा मार्गही पत्करतील. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत ते आधी सांगावे. व्यापारी नेहमीच सरकारसोबत आहोत, असेही ते म्हणाले.

पत्र परिषदेत चेंबरचे माजी अध्यक्ष हेमंत गांधी, सचिव रामअवतार तोतला, उपाध्यक्ष फारूक अकबानी, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, संजय अग्रवाल, अर्जुनदास आहुजा आणि शब्बीर उपस्थित होते.