शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

खळबळ : नागपुरात बडतर्फ कनिष्ठ लिपिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 22:32 IST

सेवेतून बडतर्फ केल्यामुळे अस्वस्थ झालेल्या कर्मचाऱ्याने सरपंच भवनात आत्महत्येचा प्रयत्न केला. अभय ठाकरे (४२) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते नागपूर जिल्हा परिषद कर्मचारी प्रशासकीय पतसंस्थेत कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांना कामावरून बडतर्फ करण्यात आले होते. त्यांनी मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सरपंच भवनातील पतसंस्थेच्या कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या सरपंच भवनातील घटना :प्रकृती चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सेवेतून बडतर्फ केल्यामुळे अस्वस्थ झालेल्या कर्मचाऱ्याने सरपंच भवनात आत्महत्येचा प्रयत्न केला. अभय ठाकरे (४२) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते नागपूर जिल्हा परिषद कर्मचारी प्रशासकीय पतसंस्थेत कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांना कामावरून बडतर्फ करण्यात आले होते. त्यांनी मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सरपंच भवनातील पतसंस्थेच्या कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.अभय ठाकरे हे गेल्या काही वर्षांपासून नागपूर जिल्हा परिषद कर्मचारी प्रशासकीय पतसंस्थेत कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची ही पतसंस्था आहे. काही काळापूर्वी या पतसंस्थेचे १५ सदस्यीय संचालक मंडळ होते. काही वादांमुळे या पतसंस्थेच्या आठ संचालक सदस्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर आता सात सदस्य संचालकांमार्फत ही पतसंस्था चालविली जात आहे. या पतसंस्थेत चार कर्मचारी असून अभय ठाकरे हे त्यातील एक आहेत. कायमतत्त्वावर हे कर्मचारी काम करीत असतात. प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते काही दिवस सुट्यांवर होते, असे सांगितले जात आहे. प्राप्त माहितीनुसार ठाकरे यांच्या सुट्यांचे प्रमाण वाढत असल्याने संचालक मंडळाने त्यांची सेवा बरखास्त केली होती. यामुळे ते प्रचंड अस्वस्थ होते. ते रोज कार्यालयात येत असत अशी माहिती प्राप्त झाली आहे. अखेर मंगळवारी त्यांनी कार्यालयाच्या परिसरातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर परिसरातील एका खासगी इस्पितळात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते.

 

टॅग्स :Employeeकर्मचारीSuicideआत्महत्या