लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डाॅ.धनराज डहाट यांचे आज सकाळी ब्रेेन हॅमरेजमुळे निधन झाले आहे. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, मुलगी, सून, नातवंड व मोठा आप्त परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर समतानगर अंबाझरी येथून दुपारी ४ वाजता निघेल व अंतिम संस्कार अंबाझरी घाटावर करण्यात येणार आहे.
मराठवाडा विद्यापीठाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याच्या मागणीसाठी निगालेला ऐतिहासिक लाॅंगमार्च आणि १६ वर्षे झालेला संघर्षातील तेए क महत्तवाचे योद्धा होते. त्यांची बरीच ग्रंथसंपदा आहे. यापैकी २२ प्रतीज्ञा, नामांतराचा इतिहास ही त्यांची पुस्तके चांगलीच गाजलेली आहेत.