शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रात्री मेडिकलवर वरिष्ठांची नजर : अधिष्ठात्यांनी तयार केले ‘टाइमटेबल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:13 IST

मेडिकलमध्ये रात्री ‘मास कॅज्युल्टी’आल्यास, रुग्णसेवेबद्दल तक्रारी असल्यास आणि इतरही सोयींच्या व्यवस्थापनेसाठी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सहा दिवसांचे ‘टाइमटेबल’ तयार केले आहे. प्रत्येक रात्रीची जबाबदारी सोपविण्यात आल्याने रात्रीचे प्रश्न रात्रीच सुटण्याची व रुग्णांना अधिक चांगली रुग्णसेवा मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देरुग्णसेवेसोबतच व्यवस्थापनेत करणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलमध्ये रात्री ‘मास कॅज्युल्टी’आल्यास, रुग्णसेवेबद्दल तक्रारी असल्यास आणि इतरही सोयींच्या व्यवस्थापनेसाठी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सहा दिवसांचे ‘टाइमटेबल’ तयार केले आहे. प्रत्येक रात्रीची जबाबदारी सोपविण्यात आल्याने रात्रीचे प्रश्न रात्रीच सुटण्याची व रुग्णांना अधिक चांगली रुग्णसेवा मिळण्याची शक्यता आहे.विदर्भासह आजूबाजूच्या चार राज्यातून मेडिकलमध्ये रुग्ण येतात. अलीकडे रात्री येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. यामुळे रात्रीचे व्यवस्थापन करण्यासाठी डॉ. मित्रा यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी सोपविली आहे. हे अधिकारी ‘ऑन कॉल’ राहणार आहेत. मात्र रात्री कुठलीही मोठी घडामोड घडल्यास त्याला जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर असणार आहे. यासंदर्भात २६ एप्रिल रोजी डॉ. मित्रा यांनी संबंधित डॉक्टरांच्या नावाने अधिकृत पत्र काढले. शनिवारपासून या सेवेला सुरुवातही झाली आहे. रात्री ८ ते सकाळी ८ अशी १२ तास वैद्यकीय अधिकारी आपली सेवा देणार आहे. रुग्णांच्या समस्यांचे निरसन करून त्यांना मदत करण्याचे मुख्य कार्य या डॉक्टरांकडे राहणार आहे. डॉ. मित्रा यांनी प्रथमच रात्रपाळीचा प्रयोग मेडिकलमध्ये सुरू केल्यामुळे निश्चितच रुग्ण व नातेवाईकांच्या समस्या सुटण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.तत्काळ समस्येचे निदान व्हावेमेडिकलमध्ये रात्री रुग्णसेवेचे व्यवस्थापन योग्य व्हावे, तत्काळ समस्येचे निदान व्हावे आणि इतरही कार्यासाठी सहा दिवस सहा ‘मेडिकल ऑफिसर’ यांची ड्युटी लावण्यात आली आहे. हे अधिकारी त्या त्या दिवशी घडलेल्या घटनेला जबाबदार असतील.-डॉ. सजल मित्राअधिष्ठाता, मेडिकल

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयHealthआरोग्य