शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

हा तर सेना-भाजपाचा ‘ड्रामा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 21:57 IST

कोकणातील नाणार प्रकल्पावरून राज्यातील राजकारण तापले असताना काँग्रेसकडून सेना-भाजपवर प्रहार करण्यात आला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात सेना-भाजपचे नेते ‘ड्रामा’ करत असून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. नाणार येथील प्रस्ताविक ग्रीन रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्यायचा प्रयत्न असून शिवसेनेने यात दुटप्पी भूमिका घेतली आहे, असे प्रतिपादन विखे पाटील यांनी केले.

ठळक मुद्देनाणार प्रकल्पावरून राधाकृष्ण विखे पाटील यांचा हल्लाबोलसत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोकणातील नाणार प्रकल्पावरून राज्यातील राजकारण तापले असताना काँग्रेसकडून सेना-भाजपवर प्रहार करण्यात आला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात सेना-भाजपचे नेते ‘ड्रामा’ करत असून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. नाणार येथील प्रस्ताविक ग्रीन रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्यायचा प्रयत्न असून शिवसेनेने यात दुटप्पी भूमिका घेतली आहे, असे प्रतिपादन विखे पाटील यांनी केले.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी रविभवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. नाणार प्रकल्पासंदर्भात विधानसभेत सरकार दावा करते ही हा प्रकल्प राज्यातच होणार, तर दुसऱ्या बाजूला उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई कामकाज थांबवून प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगतात. मंत्री म्हणून सुभाष देसार्इंचे मत हे सरकारचे मत समजले जाते. त्यामुळे या सर्व रस्सीखेचातून हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचे स्पष्ट आहे व शिवसेनादेखील त्यात साथ देत आहे, असा दावा विखे पाटील यांनी केला.सेना-भाजपची युती निश्चितयावेळी शिवसेना-भाजप यांची युती होणार असल्याचा दावादेखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. एकीकडे शिवसेना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडते. दुसरीकडे एकमेकांच्या हातात हात घालून सत्तेचा लाभ घेतला जातो. मुळात भाजपसोबत जाण्याशिवाय शिवसेनेला पर्याय नसल्यामुळे येत्या निवडणुकात भाजप-शिवसेना यांच्यात युती होणार आहे, असे विखे-पाटील म्हणाले.शेतकरी नेत्यांमध्ये सरकारने फूट पाडलीकर्जमाफी, शेतकरी समस्या व इतर प्रश्नांवर चर्चा करण्याची सरकारची तयारीच नाही. शेतकरी आंदोलनातदेखील सरकारने फूट पाडली. किसान सभेचे मूळ आंदोलन होते. मात्र ते त्यानंतर भलत्याच लोकांनी ‘टेकओव्हर’ केले. रघुनाथ पाटील यांच्यासारखे लोक शेतकरी आंदोलनात श्रेयवादाच्या लढाईतून पुढे आले, असा आरोप राधाकृष्ण-विखे पाटील यांनी केला.आघाडीबाबत कार्यकर्त्यांचा जाणून घेतला कलदरम्यान, राज्यात लोकसभेच्या दोन आणि विधानसभेची एक अशा तीन जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. यात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचादेखील समावेश आहे. या पोटनिवडणुकांसाठी त्यांनी भंडारा-गोंदिया येथील पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आघाडीसंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. मात्र कार्यकर्त्यांचा कल जाणून घेण्यासाठी ही बैठक आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलRavi Bhavan, Nagpurरविभवन नागपूर