शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईत एकाच विद्यार्थ्याची ३ शाळांमध्ये निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 23:50 IST

आरटीईत प्रवेश मिळण्यासाठी एकीकडे पालकांची ओढाताण सुरू आहे. ६५०० बालके अजूनही प्रतीक्षा यादीत आहे. असे असताना एका विद्यार्थ्याची तीन शाळांमध्ये प्रवेशासाठी निवड झाल्याचे उघडकीस आले आहे. आरटीई अ‍ॅक्शन कमिटीच्या माध्यमातून निवड प्रक्रियेतील बोगसपणा उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देआरटीई अ‍ॅक्शन कमिटीच्या माध्यमातून प्रक्रियेतील बोगसपणा उघड

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आरटीईत प्रवेश मिळण्यासाठी एकीकडे पालकांची ओढाताण सुरू आहे. ६५०० बालके अजूनही प्रतीक्षा यादीत आहे. असे असताना एका विद्यार्थ्याची तीन शाळांमध्ये प्रवेशासाठी निवड झाल्याचे उघडकीस आले आहे. आरटीई अ‍ॅक्शन कमिटीच्या माध्यमातून निवड प्रक्रियेतील बोगसपणा उघडकीस आला आहे.नागपूर जिल्ह्यात ६८० शाळांमध्ये आरटीईची प्रक्रिया राबविण्यात आली. २५ टक्के आरक्षणानुसार ६७८४ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. यासाठी ३१०४४ पालकांनी आॅनलाईन अर्ज केले होते. आरटीईच्या लॉटरीमध्ये यापैकी ६६८५ बालकांची निवड झाली. अजूनही ६५०० वर बालके निवडीच्या प्रतीक्षेत आहेत. असे असताना अनुराग जयप्रकाश गुप्ता या विद्यार्थ्याचा आरटीईच्या लॉटरीमध्ये प्रवीण सुपर फाईन कॉन्व्हेंट, गरोबा मैदान, निलकंठराव काळे कॉन्व्हेंट, श्रीकृष्णनगर व स्वामी नारायण स्कूल, पूर्व वर्धमाननगर या तीनही शाळेत त्याची निवड झाली. विशेष म्हणजे या बालकाच्या पालकाने आरटीईत अर्ज करताना वेगवेगळ्या जन्मतारखा टाकल्या होत्या. पण त्याचे नाव, पत्ता व इतर सर्व आवश्यक दस्तावेज सारखेच होते. पण आरटीईच्या प्रक्रियेत त्याचे तीनही शाळेत निवड झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.आरटीई अ‍ॅक्शन कमिटीकडे निवड झालेल्या बालकांचा संपूर्ण डाटाबेस आहे. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणात हे उघडकीस आल्यानंतर, त्याच्या पालकाने क्षमापत्र देऊन मुलाचे प्रवेश आरटीईतून रद्द केले आहे.निव्वळ जन्मतारखेचाच घोळ नाही, तर अनेक पालकांनी उत्पन्नाचा दाखला, घरभाड्याचे करारनामे बोगस दिले आहे. अंतराचा घोळसुद्धा कायम आहे. अशा अनेक प्रकारच्या बोगसगिरी पुढे येत असून, आरटीईच्या निवडप्रक्रियेवरच आमचा आक्षेप आहे. हा प्रकार तर निवड करतानाच लक्षात येण्यासारखा आहे.मो. शाहीद शरीफ, अध्यक्ष, आरटीई अ‍ॅक्शन कमिटी

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाnagpurनागपूर