शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महाज्योतीच्या २० प्रशिक्षणार्थ्यांची विक्रीकर सहाय्यकपदी निवड; चंद्रपूरचा राहुल विजय जेंगठे राज्यात प्रथम

By आनंद डेकाटे | Updated: July 20, 2023 12:59 IST

वर्ष २०२०-२१ या आर्थिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी परिक्षा प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आलेली आहे.

नागपूर : महाज्योतीच्या एम.पी.एस.सी परीक्षा प्रशिक्षणातून २० प्रशिक्षणार्थ्यांची विक्रीकर सहाय्यक पदी निवड झालेली आहे. यात १४ इतर मागास वर्ग, ५ विमुक्त जाती - जमाती, १ विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थांचा समावेश आहे.यशस्वी उमेदवारांमधे राहुल जेंगठे, गायत्री गलखे, पियुष डोंगरे, मारुती शेंदगे, रुपाली खाडे, जलिंदर कसार, पोपट करांदे, सत्यजीत साबळे, संतोष अंबुले, ऋतुजा मसाळ, अविनाश वाघमारे, मयुर लोणकार, परेश भावसार, स्वाती डोंगरे, मयुर देवरे, जगदिश केदार, हरीश शिंदे, वैभव नन्नावरे, रिंकल हडके, प्रशांत बोरकुटे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्यात तसेच केंद्र शासनात सेवेची संधी प्राप्त व्हावी, याकरीता एम.पी.एस.सी परीक्षा प्रशिक्षण योजना राबविण्यात येते. या योजने अंतर्गत विद्यार्थ्याच्या आर्थिक तसेच शैक्षणिक गरजा लक्षात घेता विद्यावेतनही पुरविल्या जाते.

विशेष म्हणजे चंद्रपुरचा राहुल जेंगठे हा विद्यार्थी राज्यात पहिला आला आहे. राहुलने आपल्या या यशाचे श्रेय आपल्या पालकासोबत महाज्योतीला, महाज्योतीच्या प्रशिक्षक वर्गाला तसेच प्रशिक्षणा दरम्यान दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाला दिलेले आहे. राहुल जेंगठे या विद्यार्थ्याचे विशेष कौतुक करुन विद्यार्थ्यांनी एमपीएससी परिक्षा प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा, असे महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी आवाहन केले आहे.

वर्ष २०२०-२१ या आर्थिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी परिक्षा प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेत सहभाग घेण्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांकडून महाज्योतीच्या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येतात. पात्र विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी परीक्षा प्रशिक्षण योजनेत सहभाग दिला जातो.

टॅग्स :Educationशिक्षणMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थी