शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
3
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
4
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
5
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
6
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
7
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
9
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
10
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
11
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
12
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
13
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
14
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
15
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
16
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
17
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
18
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
19
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
20
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ

नागपुरातील महावितरण कार्यालयावरील जप्ती अखेर टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:32 IST

महावितरणच्या गणेशपेठ येथील कार्यालयात जप्तीची कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुरू असतानाच महावितरणचे स्थानिक अधिकारी मुंबई येथील मुख्यालयाशी संपर्कात होते. अखेर दोन्ही पक्षांमध्ये तडजोड झाली.

ठळक मुद्देकार्यालयात दिवसभर सुरू होता गोंधळ प्रकरण निवळण्यासाठी अधिकारी गेले तक्रारकत्याकडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सब स्टेशनसाठी बनविण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचे बिल महावितरणने कंत्राटदाराला देण्यास असमर्थता दाखविल्याने, न्यायालयाच्या निर्देशानुसार महावितरणच्या गणेशपेठ येथील कार्यालयात जप्तीची कारवाई करण्यात आली. न्यायालयाचे बेलिफ व पोलिसांच्या संरक्षणात महावितरणच्या कार्यालयातून कॉम्प्युटर, खुर्ची आदी साहित्य कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आले. ही कारवाई सुरू असतानाच महावितरणचे स्थानिक अधिकारी सातत्याने मुंबई येथील मुख्यालयाशी संपर्कात होते. अखेर दोन्ही पक्षांमध्ये तडजोड झाली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तक्रारकर्त्याच्या घरी जाऊन शपथपत्र देत चेक सुद्धा दिला.कामठी सब स्टेशनसाठी १९८६ मध्ये रस्ता बनविण्यात आला होता. तेव्हा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने रस्त्याच्या कामात त्रुटी काढल्या होत्या. त्यामुळे कंत्राटदार सुरेंद्र शिवहरे यांच्या श्रीराम ट्रेडींग कंपनीला देण्यात येणारे २.६७ लाख रुपयांचे देयक थांबविण्यात आले होते. त्यावर कित्येक वर्ष न्यायालयात प्रकरण सुरू होते. व्याजाची रक्कम वाढून १३ लाख ५५ हजार २७७ रुपये झाली. ही रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हा न्यायालयाने महावितरणच्या स्थापत्य विभागात जप्ती करण्याचे आदेश दिले. हा आदेश घेऊन सुरेंद्र शिवहरे यांचा मुलगा अ‍ॅड. गौरव शिवहरे, मुलगी अ‍ॅड. श्वेता शिवहरे हे गणेशपेठ येथील महावितरणच्या स्थापत्य विभागाच्या कार्यालयात पोहचले. त्यांच्यासोबत गणेशपेठ पोलीस व न्यायालयाचे बेलिफ सुद्धा होते. त्यांनी कार्यकारी अभियंता प्रवीण पंचमुख यांना न्यायालायच्या आदेशाची प्रत दाखविली. कार्यकारी अभियंता यांनी याची माहिती महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. कंपनीच्या लिगल विभागाचे अधिकारी वकीलांसोबत कार्यालयात पोहचले. देयकं मिळत नसल्याचे बघून न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू झाली. कार्यालयातील खुर्ची, कॉम्प्युटर बाहेर काढण्यात आले. कारवाई होत असताना कार्यकारी अभियंता यांनी स्थापत्य विभागाचे मुख्य अभियंता, मुंबई यांना माहिती दिली. त्यानंतर तडजोडीची प्रक्रिया सुरू झाली. व्यवस्थापकीय संचालक परिचालन व वित्त यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर कारवाई टाळण्याचे अपील करण्यात आले. परंतु अ‍ॅड. शिवहरे हे कारवाईसाठी अडून बसले. दुपारी दोन्ही पक्षामध्ये ९ लाख रुपयांची तडजोड झाली. तक्रारकर्ता सुरेंद्र शिवहरे वयोवृद्ध असल्याने महावितरणचे अधिकारी त्यांच्या घरी गेले. तिथे त्यांना शपथपत्र लिहून देत चेक सुद्धा दिला. त्यानंतर प्रकरण शांत झाले.

१९ तारखेचा चेक दिलामहावितरणने शिवहरे यांना १९ नोव्हेंबरचा चेक दिला आहे. दोन्ही पक्षाने शपथपत्रावर लिहून दिले की, यानंतर प्रकरण न्यायालयात घेऊन जाणार नाही. शपथपत्र व चेक मिळेपर्यंत अ‍ॅड. गौरव शिवहरे हे महावितरणच्या कार्यालयातच बसून होते. यावेळी त्यांना महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले की, कामठी येथे बनलेले सब स्टेशन १३२ केव्हीचे आहे. ते महापारेषणच्या अंतर्गत येते. तुमचा व्यवहार महापारेषणशी आहे. पण आता महावितरण शिवहरे यांना दिलेले पैसे महापारेषणकडून मिळविण्याचा प्रयत्न करेल.

काय होते प्रकरणही कारवाई १३ लाख ५५ हजार २७७ रुपयांच्या वसुलीसाठी झाली होती. गौरव शिवहरे यांच्यामते कामठी सब स्टेशनला जाण्यासाठी रस्ता बनविण्याचा ठेका त्यांचे वडील सुरेंद्र शिवहरे यांच्या श्रीराम ट्रेडींग कंपनीला मिळाला होता. परंतु तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने त्यांच्या कामात काही त्रुटी काढून कामाचे देयकं थांबवून ठेवले होते. यासंदर्भात त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात अपिल केली. १९९८ मध्ये ठेक्याची रक्कम २.६७ लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु शिवहरे यांना पैसे मिळाले नाही. त्यामुळे शिवहरे यांनी दिवाणी न्यायालयात अपिल केले. दिवाणी न्यायालयानेही व्याजासह मूळ राशी वसूल करण्याचे आदेश दिले. तरी सुद्धा देयकं दिली नाही. अखेर रक्कम वाढून १३,५५,२७७ रुपये झाली. न्यायालयाने ही रक्कम वसूल करण्यासाठी कार्यालयाच्या जप्तीचे आदेश दिले.

टॅग्स :raidधाडmahavitaranमहावितरण