शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

साडेचार हजार किलो आंबे जप्त

By admin | Updated: May 30, 2014 01:04 IST

आंबे पिकविण्यासाठी मानवी आरोग्यास अत्यंत घातक अशा कॅल्शियम कार्बाईड वापर करणार्‍या येथील दोन प्रतिष्ठानांवर अन्न व औषध प्रशासनाने धाड घातली. या कारवाईत साडेचार हजार किलो आंबे जप्त करण्यात आले.

व्यापार्‍यांमध्ये खळबळ : पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापरचंद्रपूर : आंबे पिकविण्यासाठी  मानवी आरोग्यास अत्यंत घातक अशा कॅल्शियम कार्बाईड वापर   करणार्‍या येथील दोन प्रतिष्ठानांवर अन्न व औषध प्रशासनाने धाड घातली. या कारवाईत साडेचार  हजार  किलो आंबे जप्त करण्यात आले. त्यांची किंमत ६७ हजार ५१0 रुपये एवढी आहे.  गुरूवारी दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईने आंबे विक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात शकील ग्रुप कंपनी या नावाचे प्रतिष्ठान असून ते  शकील अहमद अब्दुल हमिद यांच्या मालकीचे आहे. या प्रतिष्ठानातून पिकलेल्या आंब्याची ठोक  भावाने विक्री केली जाते. या ठिकाणी आंबे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला  जात असल्याची गोपनिय माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. या माहितीच्या आधारे  गुरूवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास महसूल विभाग, वजन मापे विभागाच्या मदतीने सदर  प्रतिष्ठानांवर धाड टाकली. कारवाई दरम्यान तेथील आंब्याची तपासणी केली असता, आंब्याच्या साठय़ात कॅल्शियम  काबाईडच्या पुड्या ठेवल्या असल्याचे दिसले. त्यामुळे धाड टाकणार्‍या पथकाने लगेच तीन हजार  किलो आंबे जप्त करून पंचनामा केला व नमुने घेण्यात आले.ही कारवाई आटोपताच, या चमूने  त्याच परिसरातील अब्दुल हमिद अब्दुल अजिज याच्या दुकानावर धाड घातली. तेथेही आंबे  पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जात होता. या कारवाईत दुकानातून २२ हजार  ५४0 रुपये किंमतीचे एक हजार ५00 किलो  आंबे जप्त करण्यात आले. अन्न सुरक्षा अधिकारी एस.पी. नंदनवार, जी.टी. चहांदे यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचार्‍यांनी  ही कारवाई केली. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून स्थानिक गुन्हे  शाखा पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक मंगेश  काळे, सहायक उपनिरीक्षक अरुण मोते, दौलत चालखुरे, पद्माकर भोयर, अविनाश तुराणकर  यांचा समावेश होता. गुरूवारी करण्यात आलेली  चंद्रपुरातील ही पहिलीच कारवाई आहे. (प्रतिनिधी)