शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

सरत्या वर्षात आकाशात पहा फिरत्या चांदणीचा नजारा

By निशांत वानखेडे | Updated: December 2, 2024 18:48 IST

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे हाेणार दर्शन : गुरू, शुक्र, शनि आहेतच साेबतीला

निशांत वानखेडे, नागपूरनागपूर : येत्या काही दिवसात आपण २०२४ ला निराेप देणार आहाेत. या सरत्या वर्षात अंतराळातील घडामाेडी लक्ष वेधणाऱ्या आहेत. यात मानव निर्मित महाकाय आकाराचे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अर्थात अंतराळ अभ्यास व संशोधन केंद्र भर घालत असून हे स्टेशन महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणाहून ते उघड्या डाेळ्याने पाहता येईल.

येत्या ४, ५ आणि ७ डिसेंबरला एक तेजस्वी चांदणी आकाशात सरकताना दिसेल, हे अनोखे आकाश दृश्य इच्छूकांनी अवश्य बघण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले आहे. सोळा प्रगत देशांच्या संयुक्त विद्यमाने संचलित हा भव्यदिव्य प्रकल्प मानवी कल्याणार्थ नव संशोधनार्थ शून्य गुरुत्वाकर्षणात कार्यरत असून, दिवसाला १५ पृथ्वी प्रदक्षिणा दर सेकंदाला सुमारे साडेसात किलोमीटर वेगाने पूर्ण करताे. तुम्ही ज्या भागात असाल, त्या भागातून पाहू शकणार, असे दाेड यांनी सांगितले. जगभर परिचित अंतराळ संशोधक डॉ. सुनिता विल्यम्स आणि अधिक दहा वैज्ञानिक या केंद्रात असुन पृथ्वी पासून सुमारे चारशे कि.मी दूर असून त्याचा आकार फुटबॉल मैदाना पेक्षाही खूप मोठा असतो. ४ तारखेला सायंकाळी ७.१६ वाजतापासून वायव्य ते दक्षिण पश्चिमेस, ५ तारखेला सायंकाळी ६.२८ पासून वायव्येकडुन आग्नेयेकडे पाहता येईल. ७ तारखेला सायंकाळी ६.२७ वाजतापासून पश्चिम-उत्तर कडून शूक्र ग्रहा जवळून दक्षिणेकडे जाताना दिसेल. याशिवाय सायंकाळी पश्चिम आकाशात तेजस्वी शूक्र, दक्षिण आकाश मध्याशी वलयांकित शनी ग्रह आणि सध्या स्थितीत पृथ्वीच्या जवळ येत असलेला गुरु ग्रह पूर्व क्षितिजावर दिमाखात दर्शनास सज्ज आहे.

टॅग्स :nagpurनागपूर