शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा भिंत पडली : १४५०० मेट्रिक टन धान्याची सुरक्षा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 21:46 IST

पूर्व नागपुरातील वर्धमाननगर येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोडाऊनची सुरक्षा भिंत मागील सव्वा महिन्यापासून कोसळली आहे. गोदामात १४५०० मेट्रिक टन धान्य आहे. परंतु सुरक्षा भिंतीच्या डागडुजीसाठी महामंडळातर्फे काहीच उपाययोजना न करण्यात आल्यामुळे गोदामातील धान्याच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय वखार महामंडळाचा बेजबाबदारपणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्व नागपुरातील वर्धमाननगर येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोडाऊनची सुरक्षा भिंत मागील सव्वा महिन्यापासून कोसळली आहे. गोदामात १४५०० मेट्रिक टन धान्य आहे. परंतु सुरक्षा भिंतीच्या डागडुजीसाठी महामंडळातर्फे काहीच उपाययोजना न करण्यात आल्यामुळे गोदामातील धान्याच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.केंद्रीय वखार महामंडळाचे पूर्व नागपुरातील वर्धमाननगर परिसरात गोडाऊन आहे. आठ एकर परिसरातील भव्य जागेवर असलेल्या या गोडाऊनमध्ये १४ हजार ५०० मेट्रिक टन धान्य ठेवण्यात येते. मागील सव्वा महिन्यापूर्वी या गोडाऊनची १०० मीटर असलेली सुरक्षा भिंत कोसळली आहे. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात गोडाऊनमध्ये धान्य असूनही महामंडळाने सुरक्षा भिंत उभारण्यासाठी काहीच उपाययोजना केलेली दिसत नाही. गोडाऊनच्या सुरक्षेसाठी तीन पाळीत सुरक्षा रक्षक ड्युटीवर राहतात. परंतु आठ एकर परिसरातील या गोडाऊनची सुरक्षा सुरक्षा भिंतीच्या अभावी कशी करावी, असा प्रश्न सुरक्षा रक्षकांना पडला आहे. त्यामुळे या गोडाऊनमधील धान्याची सुरक्षा करण्यासाठी सुरक्षा भिंतीचे काम त्वरित करण्याची गरज निर्माण झाली आहे.अधिकारी म्हणतात, तुम्हीच भिंत बांधाकेंद्रीय वखार महामंडळाच्या कोसळलेल्या भिंतीबाबत मुंबई येथील प्रादेशिक व्यवस्थापक ए. के. दुबे यांचे लक्ष वेधले. त्यांनी कोसळलेल्या भिंतीबाबत काय कारवाई केली याची माहिती देण्यास नकार दिला. गोदामातील धान्य चोरीला जाऊ शकते असा प्रश्न विचारला असता तुम्हीच भिंत बांधा, असे अफलातून उत्तर दिले.

 

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर