शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नागपुरात अवैध शस्त्रांसह सुरक्षा रक्षकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 22:27 IST

बंदूक, कट्टा आणि पिस्तुल ठेवून सेक्युरिटीचे काम करणारा मध्यप्रदेशचा एक व्यक्ति पोलिसांच्या हाती लागला आहे. बजाजनगर पोलिसांनी त्याला अटक करून शस्त्र आणि काडतूस जप्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बंदूक, कट्टा आणि पिस्तुल ठेवून सेक्युरिटीचे काम करणारा मध्यप्रदेशचा एक व्यक्ति पोलिसांच्या हाती लागला आहे. बजाजनगर पोलिसांनी त्याला अटक करून शस्त्र आणि काडतूस जप्त केले आहे. तो बोगस दस्तावेजाच्या मदतीने शस्त्र घेऊन दहा वर्षांपासून येथे राहत होता. यासाठी त्याची मदत करणाऱ्यांचाही पोलीस शोध घेत आहे. स्वामीप्रसाद रुद्रमणी प्रसाद दुबे (४३) रा.काचीपुरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

आरोपी दुबे हा मुळचा मध्यप्रदेशातील रीवा येथील रहिवासी आहे. तो २००९ पासून नागपुरात राहत आहे. तो खासगी सुरक्षा गार्डचे काम करतो. दुबे रिवामध्येही सुरक्षा रक्षक होता. त्याच्याजवळ बारा बोरची परवाना असलेली बंदुक होती. नागपुरात अधिक वेतन आणि सुविधा मिळत असल्यामुळे तो येथे येऊन सुरक्षा गार्डचे काम करू इच्छीत होता. त्याच्या बंदुकीचा परवाना मध्यप्रदेशातील होते. त्यामुळे ते नागपुरात चालू शकणार नव्हते. याची माहिती होताच दुबेने बंदुकीचा परवाना ऑल इंडिया करण्याचा निर्णय घेतला. त्याने रिवा येथे एका स्टॅम्प पेपर वेंडर आमि सुनित मिश्रा नावाच्या नातेवाईकाशी याबाबत चर्चा केली. दोघांनीही त्याला ऑल इंडिया लायसन्स बनवून देण्याचे आमीष दखविले. दुबेही त्यांच्या सांगण्यानुसार वागण्यास तयार झाला. त्या दोघंनी सांगितल्यानुसार दुबेने आपल्या परवान्यात खोडखाड करीत त्यावर ‘ऑल इंडिया’ अशी नोंद केली. ते लायसन्स घेऊन तो २००९ मध्ये नागपुरात येऊन नोकरी करू लागला.बजाजनगर पोलिसांना दुबेजवळ अवैध शस्त्र असल्याची माहिती मिळाली. या आधारावर पोलिसांनी त्याच्या घरावर धाड टाकली. तेथे पोलिसांना बारा बोरची बंदुक, कट्टा, एअर गन, ८ काडतूस आणि दस्तावेज सापडले. दस्तावेजांची तपासणी केली असता पोलिसांना संशय आला. दुबेला विचारपूस केली तेव्हा खरा प्रकार उघडकीस आला.१९९० मध्ये दुबेच्या गावावर दरोडेखोरांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात दुबेच्या आते भावाचा मृत्यू झाला. तर वडील जख्मी झाले होते. या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणामुळे दुबेने देशी कट्टा खरेदी केला. पीडित असल्याने सरकारनेही परवाना जारी केला. बंदुकीचा परवाना मिळाल्याने आपल्याकडे अवैध शस्त्र असल्याचे कुणाला कळणार नाही, याची त्याला खात्री पटली. यानंतर त्याने एअर गन खरेदी केली. २००९ मध्ये परवाना ऑल इंडिया बनवण्यासाठी त्याने वेगळीच शक्कल लढवली. त्याने रिवा जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने जारी झालेले बोगस आदेश बनवले. त्यात गृह विभागाच्या आदेश संख्येचा उल्लेख करीत शस्त्र परवान्याची सीमा ऑल इंडिया करण्यात येत असल्याचा उल्लेख होता.  ऑल इंडिया शस्त्र जारी करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना नाहीत. गृह मंत्रालय हेच सक्षम प्राधिकरण आहे. याबाबत पोलिसांना माहिती असल्याने त्यांना रिवा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश बोगस असल्याचा संशय आला. पोलिसांनी सक्तीने विचारपूस करताच दुबेने आपला गुन्हा कबूल केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या बोगस आदेशासोबतच दुबेने छिंदवाडा पोलीस आणि शस्त्र डीलरचे रबर स्टॅम्पही बोगस बनवले होते. त्यावरही शस्त्र परवाना ऑल इंडिया करण्यात येत असल्याचा उल्लेख होता. पोलीस दुबेचा नातेवाईक व स्टॅम्प व्हेंडरच्या शोधासाठी मध्य प्रदेशातही गले होते. परंतु दोघाचाही पत्ता लागला नाही. दुबेच्या कुटुंबात पत्नी आणि दोन विवाहित मुली आहेत. चांगली नोकरी मिळवण्याच्या आमिषामुळे बोगसपणा केल्याने त्याला तुरुंगाची हवा खावी लागत आहे. तो ३ ऑगस्टपर्यंत पोलिसांच्या कोठडीत आहे.   शस्त्र परवान्याचे दर तीन वर्षानंतर नुतनीकरण केले जाते. मूळ परवान्यात खोडखाड केल्याने त्याचे नुतनीकरण शक्य नव्हते. यामुळे दुबेने रिवा पोलिसांकडे परवाना हरवल्याची तक्रार दाखल केली होती. या आधारावर दुबेने डुप्लिकेट परवाना मिळवला होता. याचप्रकारे तो शस्त्र डीलरच्या बोगस सही शिक्क्याचा वापर करून काडतूसच्या संख्येतही गोलमाल करीत होता. दुबेचे कृत्य पाहून पोलीसही आश्चर्यचकित आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे