शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंग विरोधात आंदोलनानंतर कडेकाेट सुरक्षा बंदाेबस्त

By निशांत वानखेडे | Updated: July 2, 2024 18:00 IST

चारही भागातील मार्ग केले बंद : सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात प्रवेश बंदी

नागपूर : दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगवरून साेमवारी उसळलेल्या आंदाेलनानंतर मंगळवारी सकाळपासून या परिसरात सुरक्षा बंदाेबस्त वाढविण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पाेलिसांनी दीक्षाभूमीवर प्रवेश बंदी लावली असून चारही भागातील वाहतूकही बंद करण्यात आली आहे.

नव्या विकास आराखड्यानुसार दीक्षाभूमीवर भूमिगत पार्किंगविराेधात जनक्षाेभ उसळला व साेमवारी त्याचे पडसाद दिसले. हजाराे आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमी परिसरात तीव्र आंदाेलन केले. बांधकाम साहित्याची जाळपाेळ करून अर्धवट बांधकामाच्या सळाकांची माेडताेड करण्यात आली. त्यामुळे दिवसभर या परिसरात तणावाचे वातावरण हाेते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिगत पार्किंगच्या कामाला स्थगिती देण्याच्या घाेषणेनंतर जनक्षाेभ शांत झाला.

दरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मंगळवारी संपूर्ण परिसरात कडेकाेट बंदाेबस्त करण्यात आला. सकाळपासून चारही बाजुने दीक्षाभूमिकडे जाणारे मार्ग बंद करून प्रवेशबंदी लावण्यात आली. काछीपुरा चाैक ते अण्णाभाऊ साठे स्मारक चाैक ते लक्ष्मीनगर व लक्ष्मीनगर ते बजाजनगर हे मार्ग बॅरिकेड लावून बंद करण्यात आले. कुणालाही आतमध्ये प्रवेशास मनाई करण्यात आली.

नियमित अभिवादनासही सध्या बंदीयादरम्यान नियमित अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांनाही प्रवेशास बंदी करण्यात आली. त्यामुळे अभिवादनास आलेल्या काही महिलांशी पाेलिसांची बाचाबाची झाल्याचीही माहिती आहे. मात्र उसळलेल्या जनक्षाेभानंतर बांधकामाचे साहित्य दीक्षाभूमी परिसरात विखुरलेले आहेत. लाेखंडाच्या सळाका निघाल्या आहेत व साहित्यही पसरलेले आहेत. या साहित्यामुळे लाेकांना इजा हाेण्याची व अपघात हाेण्याची शक्यता लक्षात घेत प्रवेश बंदी करण्यात आली असल्याचे पाेलीस प्रशासनाने म्हणणे आहे. मात्र वेगळा संदेश जाण्याची शक्यता लक्षात घेता अनुयायांना बंदी करू नये, असे लाेकांचे म्हणणे हाेते.

परिसरात वाहतुकीचा खाेळंबादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात कडेकाेट बंदाेबस्त लावल्यानंतर काछीपुरा ते अण्णाभाऊ साठे स्मारक चाैक ते लक्ष्मीनगर चाैक ते बजाजनगर या मार्गाची वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा माेठा गाेंधळ उडाल्याचे दिसले. एकिकडे अंबाझरीचा मार्ग बंद, दुसरीकडे व्हीएनआयटी गेट ते श्रद्धानंद चाैकापर्यंत बांधकाम साहित्य पडले असल्याने वाहतुकीचा बाेजवारा उडत असताना दीक्षाभूमी परिसरातील मार्ग बंद झाल्याने माेठा खाेळंबा दिसून येत आहे. या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचेही पहावयास मिळाले.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर